Farmer Protest after CJP March: दिल्लीत नेमकं चाललंय काय? एकीकडे सीजेपीचे वादळ, दुसरीकडे हजारो शेतकरी दिल्लीत रवाना; शेकडो पोलीस तैनात

एकीकडे नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ कॉक्रोज जनता पार्टीसह देशभरातील विद्यार्थ्यांनी आंदोलनाची हाक पुकारली असताना दुसरीकडे दिल्लीत हजारो शेतकरी दिल्लीत रवाना झाले आहेत.

Farmer Protest after CJP March: दिल्लीत नेमकं चाललंय काय? एकीकडे सीजेपीचे वादळ, दुसरीकडे हजारो शेतकरी दिल्लीत रवाना; शेकडो पोलीस तैनात

राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर येथे 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) द्वारे आयोजित करण्यात आलेल्या 'संसद मोर्चा' दरम्यान जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. आंदोलकांवर पोलिसांकडून करण्यात बळाचा वापर करत लाठीचार्ज करण्यात आला. एवढचं नव्हे तर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला, तर संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला. यावेळी आंदोलक संसद भवन परिसरापर्यंत पोहोचल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी तत्काळ बंदोबस्त वाढवत संसद भवनाचे मुख्य प्रवेशद्वार बंद केले.

हेही वाचा- Sonam Wangchuk: '…तोपर्यंत माघार नाही'; पोलिसांच्या कारवाईनंतर सोनम वांगचुक यांचा मोठा निर्णय

दरम्यान एकीकडे नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ कॉक्रोज जनता पार्टीसह देशभरातील विद्यार्थ्यांनी आंदोलनाची हाक पुकारली असताना दुसरीकडे दिल्लीत हजारो शेतकरी दिल्लीत रवाना झाले आहेत. दिल्लीतील किसान घाटवर पंजाब, हरियाणा तसेच इतर अनेक राज्यांतील हजारो शेतकरी आज आयोजित केलेल्या महापंचायतीत सहभागी होणार आहेत. यात शेतकरी ट्रॅक्टर मोर्चा न काढता बस आणि खासगी वाहनांद्वारे दिल्लीत धडकणार आहेत.

शेतकऱ्यांचे हे आंदोलन भारत-अमेरिका व्यापार कराराविरोधात आहे. या करारामुळे देशातील कृषी क्षेत्रावर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि शेतकरी, तसेच लहान व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते. दरम्यान सीजेपीच्या आंदोलन आणि मोर्च्याची पार्श्वभूमी पाहता हरियाणा प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करत पंजाब-हरियाणा दरम्यानची शंभू सीमा पूर्णपणे सील केली आहे. यावेळी विविध भागांतून शेतकऱ्यांचे ताफे दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी थेट इशारा देत म्हटलं आहे की, वाटेत अडथळे निर्माण झाले तरी आंदोलन मागे घेतले जाणार नाही. याचपार्श्वभूमिवर पंजाब आणि हरियाणाला जोडणाऱ्या घग्गर पुलावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली असून शंभू सीमेवर मोठ्या प्रमाणात बॅरिकेड्स उभारले आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number