Sadabhau Khot On CJP Protest : "या आतंकवाद्यांना…" सदाभाऊ खोत हे काय बोलून गेले? सीजेपीच्या मोर्च्यावरील वक्तव्याने नवा वाद निर्माण?

दिल्लीच्या जंतर मंतरपासून संसदेपर्यंत सुरु झालेल्या कॉक्रोज जनता पार्टीचे आंदोलन चांगलेच चिघळल्याचे पाहायला मिळाले. अशातच शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी देखील सीजेपीच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिलीय.

Sadabhau Khot On CJP Protest : &quotया आतंकवाद्यांना…&quot सदाभाऊ खोत हे काय बोलून गेले?  सीजेपीच्या मोर्च्यावरील वक्तव्याने नवा वाद निर्माण?

काल दिल्लीच्या जंतर मंतरपासून संसदेपर्यंत सुरु झालेल्या कॉक्रोज जनता पार्टीचे आंदोलन चांगलेच चिघळल्याचे पाहायला मिळाले. सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून उचलण्याच आल्याच्या निषेधार्थ काल राजधानी दिल्ली येथे कॉक्रोज जनता पार्टी आणि लाखोंच्या संख्येत जमा झालेल्या विद्यार्थ्यांनी संसद भवना बाहेर मोर्चा काढला होता. यावेळी प्रशासनाने आंदोलकांना जंतर-मंतरपासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या केरळ भवनापर्यंतच जाण्याची परवानगी दिली होती.

मात्र, जमावाने संसदेच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्न करताच पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार चकमक उडाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शीघ्र कृती दलाने आंदोलकांवर थेट काठ्या चालवल्या. आंदोलक संसद भवन परिसरापर्यंत पोहोचल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी तत्काळ बंदोबस्त वाढवत संसद भवनाचे मुख्य प्रवेशद्वार बंद केले. दरम्यान कालच्या दिल्लीतील घडामोडीवर देशभरातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी देखील सीजेपीच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. मात्र त्यांनी दिल्लीत जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलकांना आतंकवाद्यांची उपमा दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून संतापाची लाट उसळली आहे. 

हेही वाचा- CJP Protest : दिल्ली पोलिसांकडून जबर लाठीचार्ज, एक तरुणी थेट आयसीयुमध्ये दाखल; अभिजीत दीपकेंनी पोस्ट करत दिली धक्कादाय माहिती

सदाभाऊ खोत म्हणाले की, “पेपरफुटीमुळे गोंधळ सुरु आहे, यात निश्चितच षडयंत्र आहे. दोषींना पकडले गेले आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं चौकशी सुरु आहे. दोषींना सोडणार नाही अशी भूमिका सरकारनं घेतली आहे. नीट उत्तीर्ण झाले ते ॲडमिशनसाठी धावपळ करत आहे. मात्र ज्यांचा संबंध नाही ते राजीनाम्याची मागणी करत आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा संबंध नाही. प्रकरण लावून धरलं चौकशीचे आदेश दिले. मात्र इंडिया आघाडी मविआला केंद्र आणि राज्यातले सरकार आहे. त्यांच्या विरोधात वातावरण तयार करणे, सातत्याने खोटे बोलत राहाणे, इंडिया मविआ म्हणते आमचा संबंध नाही.” 

“एक ट्रोल आहे, जयंत पाटील यांचा ग्रुप चालवतो. संपूर्ण प्रकरण अशांतता माजवण्याचे प्रकरण राष्ट्रवादी करत आहे. आय लव्ह जयंत पाटील पेजवर देखील आंदोलनात तेल टाकण्याचा प्रयत्न करत आहे. इंडिया आघाडी, मविआ आंतकवादासारखी परिस्थिती निर्माण करु पाहात आहे. शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा सरकारने मूळीच घेऊ नये. केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि शिक्षणात धर्मेंद्र. या आतंकवाद्यांना लोकशाही मार्गाने सरकारनं उत्तर द्यावे. या आंतकवाद्यांना हे सहन होत नाही.” दरम्यान सदाभाऊ खोत यांनी केलेल्या या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तावली जात आहे. तसेच यावर आता राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया येते हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number