Chandrashekhar Bawankule : शासकीय रस्ता अडवला तर थेट योजनांपासून होणार वंचित; बावनकुळेंचा शेतकर्‍यांना थेट इशारा

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

Chandrashekhar Bawankule : शासकीय रस्ता अडवला तर थेट योजनांपासून होणार वंचित; बावनकुळेंचा शेतकर्‍यांना थेट इशारा

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शेतकर्‍यांकरिता काहीना काही नव्या योजना माध्यमांद्वारे मांडत असतात. मात्र यावेळी त्यांनी शेतकऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. शेत आणि पाणंद रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या किंवा रस्त्याचे नुकसान करणाऱ्यांविरोधात आता कठोर कारवाई करणार असल्याचा थेट इशारा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. शासकीय रस्ता अडवणाऱ्या किंवा त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांचे आधार कार्ड आणि फार्मर आय-डी बंद करण्यात येणार असून यामुळे संबंधित व्यक्ती शासनाच्या कोणत्याही योजना आणि मदतीसाठी पात्र ठरणार नाही.

हेही वाचा- Narhari Zirwal calls Devendra Fadnavis : ‘त्या’ व्हिडिओवरून राजकारण तापले! झिरवळांचा थेट मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना फोन; काय झाली चर्चा
यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “महाराष्ट्रात मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ते योजना सुरू झाली आहे. या योजनेला विधानसभा स्तरावर समित्या तयार करण्यात आल्या. रस्त्याची मोजणी करणे, रस्त्याला क्रमांक देणे आणि मग रस्त्याचे बांधकाम करणे आणि मोजणी झाल्यानंतर बाउंड्रीला झाडे लावून बाउंड्री फिज करणे. त्यामुळे रस्त्यावर कधीहीअतिक्रमण होणार नाही. पण शासकीय पांदण रस्ता आहे आणि अनेक शेतकर्‍यांनी त्यावर अतिक्रमण केले आहे. शासकीय रस्ता अडवला किंवा त्यावर अतिक्रमण केलं तर त्या शेतकर्‍यांचे फार्मर आयडी आम्ही बंद करणार आहोत. त्यामुळे त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही”.

“त्यामुळे माझी शेतकऱ्याला अशी विनंती आहे की, हे शेतकर्‍यांनी, शेतकर्‍यांकरिता करायचा आहे. तुमच्या शेतात रस्ता आता तुम्ही अतिक्रमण केलं मागचा शेतकरी रस्ता नाही, त्यामुळे त्यांना भांडावा लागतंय. तहसीलदाराकडे एडीओकडे अपील सुरु आहेत. त्यामुळे हे महत्त्वाचं होतं म्हणून आपल्या माध्यमातून शेतकरी वर्गाला माझी विनंती आहे की शेतरस्यावर, पान रस्त्यावर, सरकारी रस्त्यावर अतिक्रमण असेल तर काढून टाकावे. जेणेकरून आम्हाला तिथे रस्ता करता येईल आणि रस्त्याच्या कडेला झाडे लावता येईल. रस्त्याच्या कडेला म्हणजेच हायवेच्या कडेला सर्विस रोड बांधतो आहे. रेल्वेच्या कडेला सर्विस रोड बनतो आहे आणि शेतकर्‍यांना राईट ऑफ वे प्रकल्पाला बंधनकारक केले आहे एखाद्या शेतकर्‍याच्या शेतीचे दोन भाग पडले असेल तर त्याला त्या ठिकाणी रस्ता बांधून द्यायचा असा नियम आहे”, असं स्पष्ट करत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट इशारा दिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number