BMC Election 2026: एबी फॉर्म गिळल्याची घटना ताजी असतानाच मुंबईत नवा राडा; भाजप उमेदवाराचा ‘बनावट’ फॉर्मचा कारनामा

मुंबई महापालिका निवडणुकीत वॉर्ड 173 मध्ये भाजपच्या महिला उमेदवाराने बनावट एबी फॉर्म जोडून अर्ज भरल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

BMC Election 2026: एबी फॉर्म गिळल्याची घटना ताजी असतानाच मुंबईत नवा राडा; भाजप उमेदवाराचा ‘बनावट’ फॉर्मचा कारनामा

मुंबई: राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. पुण्यात एका उमेदवाराने रागाच्या भरात एबी फॉर्म गिळून टाकल्याची घटना ताजी असतानाच, आता मुंबईत एका महिला उमेदवाराने थेट पक्षाचा ‘बनावट’ (Duplicate) एबी फॉर्म जोडून अर्ज भरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे भारतीय जनता पार्टी वर मोठी नामुष्की ओढावली असून थेट निवडणूक आयोगाकडे धाव घ्यावी लागली आहे.

मुंबईतील वॉर्ड क्रमांक 173 मध्ये हा संपूर्ण प्रकार घडला आहे. शिल्पा केळुसकर या भाजपच्या इच्छुक उमेदवार होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, पक्षाकडून नजरचुकीने सुरुवातीला त्यांना एबी फॉर्म देण्यात आला होता. मात्र, पक्षाच्या धोरणानुसार तो फॉर्म तातडीने त्यांच्याकडून परत घेण्यात आला. हक्काचे तिकीट हुकल्याने नाराज झालेल्या केळुसकर यांनी माघार न घेता चक्क बनावट एबी फॉर्मची युक्ति लढवली आणि तोच फॉर्म निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केला.

सोमवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी हा सगळा गोंधळ उघड झाला. भाजपने मुंबईतील अनेक प्रभागांमध्ये आपल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा केली होती. मात्र, 173 नंबरच्या वॉर्डात केळुसकर यांनी पक्षाचा अधिकृत शिक्का आणि स्वाक्षरी असल्याचा दावा असलेला बनावट फॉर्म जोडल्याने प्रशासकीय यंत्रणाही चक्रावून गेली. भाजपच्या अंतर्गत पडताळणीत हा फॉर्म बनावट असल्याचे स्पष्ट होताच पक्षात एकच खळबळ उडाली आणि नेत्यांची धावपळ सुरू झाली.

हेही वाचा: Tax Burden on Cigarette: सिगरेटचा झुरका महागणार! खिशाला कात्री लावणारा केंद्राचा नवा 'टॅक्स' प्लॅन'

या गंभीर प्रकरणाची दखल घेत मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी लगेचच हालचाली सुरू केल्या. त्यांनी Election Commission of India यांना कडक पत्र पाठवून शिल्पा केळुसकर यांनी सादर केलेला बनावट एबी फॉर्म रद्द करण्याची मागणी केली आहे. “उमेदवाराने पक्षाची फसवणूक करून खोटा फॉर्म जोडला असून, तो तातडीने अवैध ठरवण्यात यावा,” अशी अधिकृत तक्रारही त्यांनी नोंदवली आहे. त्यामुळे आता केळुसकर यांचा अर्ज बाद होणार की कायदेशीर पेच निर्माण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उमेदवारी अर्जासोबत पक्षाचा अधिकृत पाठिंबा दर्शवणारा एबी फॉर्म हा निवडणूक प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो. अशा संवेदनशील कागदपत्राची हुबेहूब प्रत तयार करून ती सादर करणे, हा गंभीर गुन्हा समजला जातो. या घटनेमुळे भाजपच्या अंतर्गत शिस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, मुंबईच्या राजकीय वर्तुळात या ‘बनावट एबी फॉर्म’ प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.

आता निवडणूक निर्णय अधिकारी या प्रकरणावर कोणता निर्णय देतात आणि संबंधित उमेदवारावर फौजदारी कारवाई होते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. निवडणुकांच्या तोंडावर घडलेल्या या नाट्यामुळे वॉर्ड 173 मधील लढत अधिकच रंजक आणि वादग्रस्त ठरली आहे.

हेही वाचा: Nashik Akkalkot Highway: पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्राला मोठा दिलासा; 374 किमी लांबीच्या नाशिक-अक्कलकोट महामार्गाची घोषणा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number