संभाजी भिडे नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. त्यातच आता संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी विरोधात वादग्रस्त विधान केलं आहे, आणि त्याचे पडसाद संपूर्ण भारत भर उमटताना दिसत आहे. “महात्मा गांधी यांचे वडील मुसलमान होते” असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे. त्यामुळे संपूर्ण जनतेमध्ये आक्रोश वाढलेला दिसत आहे. तसेच संभाजी भिडेंवर योग्य कारवाई करावी अशी मागणी सर्वच स्थरावरून केली जात आहे.
‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याची दाखल घेतली आहे. ‘कोणत्याही परिस्थितीमध्ये महात्मा गांधी यांचा अपमान सहन केला जाणार नाही’, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे संपूर्ण राज्यभर त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. अनेक ठिकाणी भिडे गुरुजींच्या विरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. तसेच भिडे गुरुजींनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळातून देखील प्रतिक्रिया उमटत आहेत.
‘महात्मा गांधी देशाचे राष्ट्रपिता आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे महानायक आहेत, त्यांच्याबद्दल असं वक्तव्य करणं चुकीचं आहे.’ तसेच भिडे गुरुजी आणि इतर कोणीही अशाप्रकारचे वक्तव्य करु नये असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे जनतेमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत असल्याचं देखील यावेळी फडणवीसांनी म्हटलं आहे. त्यामुळे लोकांना अशा प्रकराचं वक्तव्य सहन होणार नसल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे. तसेच या संदर्भात उचित कारवाई करण्यात येईल असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.