मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला?

येत्या 14 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला?

महाराष्ट्र: महाराष्ट्रात महायुती सरकार स्थापन झाले. महायुती सरकारचा शपथविधी मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. या शपथविधी सोहळ्यानंतर आता सर्वांचे लक्ष लागून आहे ते मंत्रिमंडळ विस्ताराकडे. त्यातच आता मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला असल्याचं समोर आलं आहे. येत्या 14 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची शक्यता आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रविवारी  झालेल्या बैठकीत ही तारीख निश्चित झाली असल्याचं समोर आलं आहे. 

याबाबत सविस्तर 
महायुती सरकारमध्ये खातेवाटपावरून वाद सुरु असल्याचं देखील बोललं जातंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अजूनही गृह खात्यासाठी आग्रही असले तरी गृह खाते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार असल्याचे शिंदे यांना स्पष्ट सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता नगरविकास खात्यासाठी शिंदे आग्रही आहेत. गेली पाच वर्षे शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते आहे. मात्र, या खात्याच्या कारभारावरून मुंबईतील अनेक विकासकांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रारी केलेल्या आहेत. त्यामुळे आता नक्की कोणतं खात कोणाकडे जाणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. 

दरम्यान 14 डिसेंबरला महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि पवार हे तिघेच हिवाळी अधिवेशन चालवतील. आणि मंत्रिमंडळ विस्तार जानेवारी महिन्यात केला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number