‘मविआत प्रत्येकाचं स्थान महत्त्वाचं’

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीतील जागा वाटपावर तिन्ही पक्षांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. त्यावर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना स्पष्टपणे भाष्य केलं. महाविकास आघाडीत जागा वाटपाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. आगामी निवडणुका एकत्रपणे लढवायच्या यावर एकमत झाल्याचे शरद पवार यांनी सांगितले. शरद पवार पुढे म्हणाले, तिन्ही पक्षांचे प्रत्येकी दोन सदस्य […]

‘मविआत प्रत्येकाचं स्थान महत्त्वाचं’

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीतील जागा वाटपावर तिन्ही पक्षांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. त्यावर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना स्पष्टपणे भाष्य केलं. महाविकास आघाडीत जागा वाटपाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. आगामी निवडणुका एकत्रपणे लढवायच्या यावर एकमत झाल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

शरद पवार पुढे म्हणाले, तिन्ही पक्षांचे प्रत्येकी दोन सदस्य जागा वाटपासंदर्भात चर्चा करणार आहेत. त्यामध्ये काही अडचण आली तर मी, उद्धव ठाकरे , मल्लिकार्जुन खर्गे किंवा सोनिया गांधी निर्णय घेणार, असे सिल्व्हर ओकवर झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत ठरल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. आघाडीत पहिल्या क्रमांकाचा पक्ष कोणता, दुसऱ्या क्रमांकाचा कोणता याला महत्त्व नाही. माझ्यासाठी सगळेच पक्ष महत्त्वाचे असल्याचे सांगत शरद पवारांनी लहान भाऊ-मोठा भाऊ वादावर पडदा टाकला.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ईडीच्या चौकशीवर बोलताना शरद पवार म्हणाले, राष्ट्रवादीच्या दहा नेत्यांची आतापर्यंत चौकशी करण्यात आली आहे. अनिल देशमुखांना सनाहक तुरुंगवास घडला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात कितीतरी तक्रारी दाखल आहेत. त्याची यंत्रणांनी नोंद घ्यावी. राज्यात तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु असून हा गैरवापर कसा होतोय हे दिसून येत असल्याचे शरद पवार म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number