Municipal Election Result 2026 : निकालाआधीच विजयी पताका! भाजपचे 7 उमेदवार बिनविरोध विजयी

29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी सर्वत्र जोरदार तयारी पाहायला मिळत आहे. अशातच महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाआधीच भाजपने विजयी पताका फडकवले आहे.

Municipal Election Result 2026 : निकालाआधीच विजयी पताका! भाजपचे 7 उमेदवार बिनविरोध विजयी

बृहन्मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी सर्वत्र जोरदार तयारी पाहायला मिळत आहे. अशातच काही ठिकाणी भाजपचा रस्ता मोकळा झाला आहे. अहिल्यानगरसह धुळे आणि पनवेलमध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाआधीच भाजपने विजयी पताका फडकवले आहे. यावेळी अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या पहिला महिला उमेदवारान पहिलं खातं उघडलं आहे. प्रभाग क्रमांक 7 ब मधून शिवसेना शिंदे गटाच्या श्रद्धा रवींद्र वाकळे आणि अपक्ष कविता दीपक खेडकर या उमेदवाराने माघार घेतल्याने भाजपच्या पुष्पा बोरुडे बिनविरोध विजयी झाल्या आहेत. तसेच बोरुडे यांच्या बिनविरोध निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. 

हेही वाचा- Nagpur Politics: नागपुरात हायव्होल्टेज ड्रामा; समर्थकांनी बंडखोर नेत्यालाच घरातच डांबलं, नेमकं झालं काय?
त्याचसोबत धुळे महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपाची आणखी एक जागा बिनविरोध झाली असून भाजपाचे प्रभाग क्रमांक 17 अ चे उमेदवार अमोल मासुळे यांचा बिनविरोध विजय झाला आहेत. प्रभाग क्रमांक 17 मधील भाजपाच्या उमेदवाराच्या विरोधातील शिवसेना शिंदे गटाच्या चारही अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अमोल मासुळे बिनविरोध विजय उमेदवार ठरले. यावेळी आमदार अनुप अग्रवाल यांच्या पक्ष कार्यालयात धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार अनुप अग्रवाल माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. सलग तिसऱ्यांदा आपण विजयी झालो असून प्रभागाचा विकास हेच आपलं ध्येय असल्याचं विजय उमेदवार अमोल मासोळे यांनी यावेळी सांगितलं. 

हेही वाचा- Ramdas Athawale vs Raj Thackeray : राज ठाकरेंची भाषणं भारी, पण पाटी कोरी…; रामदास आठवलेंची राज ठाकरेंवर कविता
दरम्यान पनवेलमध्ये मनपा निवडणुकीपूर्वीच भाजपाला मोठे यश मिळाले असून भाजपचे 5 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत. प्रत्यक्ष मतदान होण्याआधीच पनवेल महापालिकेत भाजपच्या नगरसेवकांची संख्या पाच वर पोहोचली. या घडामोडीमुळे महाविकास आघाडीच्या रणनीतीला मोठा धक्का बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रभाग क्रमांक 18 मधून नितीन पाटील, प्रभाग क्रमांक 19 मधून दर्शना भोईर आणि रुचिता लोंढे, प्रभाग क्रमांक 20 मधून अजय बहिरा आणि प्रियंका कांडपिळे बिनविरोध निवडून आले आहेत. महाविकास आघाडीला हा मोठा धक्का असून आणखी तासाभरात हा आकडा किती वाढतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. उमेदवारी मागे घेऊन हे सर्व उमेदवार नॉट रिचेबल झाले असून पनवेल मध्ये घोडेबाजार मोठ्या प्रमाणात होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number