Enrgy Drink Bans in School Area: सरकारचा मोठा निर्णय; राज्यात शाळा परिसरामध्ये ‘या’ सॉफ्ट ड्रिंक विक्रीला बंदी

या पेयांच्या विक्रीमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

Enrgy Drink Bans in School Area: सरकारचा मोठा निर्णय; राज्यात शाळा परिसरामध्ये ‘या’ सॉफ्ट ड्रिंक विक्रीला बंदी

राज्यातील शाळकरी विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व शाळांच्या 500 मीटर परिसरात 'स्टिंग' एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवर बंदी घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी शाळांच्या परिसरात विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर ऊर्जा पेये सहज उपलब्ध होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. या पेयांच्या विक्रीमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. तसेच शाळांच्या परिसरात अशा पेयांच्या विक्रीवर निर्बंध घालण्याची मागणीही त्यांनी केली.

यावर उत्तर देताना संबंधित मंत्री नरहरी झिरवळ यांनी शाळांच्या 500 मीटर परिसरात 'स्टिंग' एनर्जी ड्रिंकची विक्री बंद करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती सभागृहात दिली.

या निर्णयामुळे शाळांच्या परिसरात विद्यार्थ्यांना एनर्जी ड्रिंक सहज उपलब्ध होण्यावर आळा बसणार असल्याचे मानले जात आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी संबंधित विभाग आणि स्थानिक प्रशासनाला आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहितीही देण्यात आली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number