पुण्यात कॉलेज विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत विद्यार्थ्याचं महेश रमेश शेंडगे (२२) असं नाव आहे.
मृत पावलेला हा तरुण पुण्यातील K J इन्स्टिट्यूट ऑफ कॉलेजमध्ये डिप्लोमाचं शिक्षण घेत होता.
पुण्यातील पुरंदरमधील अमराई तलावात या तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे.
डिप्लोमाची परीक्षा दिल्यानंतर महेश आपल्या ७-८ मित्रांसोबत पोहण्यासाठी आमराई तलावावर गेला होता. यावेळी हा अपप्रकार घडला.
मंगळवारी ३ मार्चला दुपारी ३ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.
मृत पावलेला महेश मूळचा दौंड तालुक्यातील मलठन या गावचा आहे.