रशियन वृत्तवाहिनीच्या कर्मचाऱ्यांनी दिले राजीनामे

रशिय-युक्रेन युद्धामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली असून रशियातही या युद्धावर टीका केली जात आहे. या युद्धाचे वार्तांकन जगभरात सुरू असून रशियातही वार्तांकन करण्यात येत आहे. मात्र, रशियाने युद्धाचे वार्तांकन बंद करण्याचे आदेश दिले. त्यामुळे या युद्धाचा निषेध करत ‘टीव्ही रेन’ रशियन वृत्त वाहिनीच्या कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. रशियाने युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धाचे वार्तांकन बंद करण्याचे […]

रशियन वृत्तवाहिनीच्या कर्मचाऱ्यांनी दिले राजीनामे

रशिय-युक्रेन युद्धामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली असून रशियातही या युद्धावर टीका केली जात आहे. या युद्धाचे वार्तांकन जगभरात सुरू असून रशियातही वार्तांकन करण्यात येत आहे. मात्र, रशियाने युद्धाचे वार्तांकन बंद करण्याचे आदेश दिले. त्यामुळे या युद्धाचा निषेध करत ‘टीव्ही रेन’ रशियन वृत्त वाहिनीच्या कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.

रशियाने युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धाचे वार्तांकन बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे युद्धाचा निषेध म्हणून ‘टीव्ही रेन’ या रशियन वृत्तवाहिनीच्या कर्मचाऱ्यांनी थेट प्रक्षेपण सुरू असताना राजीनामे दिले आहेत. बातमीपत्राचे थेट प्रक्षेपण सुरू असताना ‘नो टू वॉर’ म्हणत वृत्तनिवेदकाने राजीनामा दिला आणि त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिले.

स्वतंत्र भूमिकेसाठी ‘टीव्ही रेन’ या रशियन वृत्त वाहिनीकडे पाहिले जाते. पत्रकारांनी दोन्ही देशात लवकरच शांतता नांदावी यासाठी भूमिका घेण्याचे ठरवले, अशी माहिती वृत्त वाहिनीचे प्रमुख नतालिया सिंदेयेव्हा यांनी सांगितले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number