इस्राईलच्या दूतावासाकडून शिवरायांना मानवंदना

शिवराय जन्मोत्सवानिमित्त इस्राईलच्या वाणिज्य दूतावासाकडून विशेष शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. इस्राईलचे भारतातील वाणिज्यदूत कोबी शोशानी यांच्यासह अनेक इस्रायली सनदी अधिकाऱ्यांनी शिवरायांचा जयजयकार केला आहे. इस्राईलच्या दुतावासाने एक ट्विट करत शिवजयंतीच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. या ट्विटमध्ये राज्यातील शिवजयंती सोहळ्याचा व्हिडीओ ट्विट करत या व्हिडीओच्या माध्यमातून इस्राईलच्या राजदुतांनी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, राज्यात आज (१९ फेब्रुवारी) […]

इस्राईलच्या दूतावासाकडून शिवरायांना मानवंदना

शिवराय जन्मोत्सवानिमित्त इस्राईलच्या वाणिज्य दूतावासाकडून विशेष शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. इस्राईलचे भारतातील वाणिज्यदूत कोबी शोशानी यांच्यासह अनेक इस्रायली सनदी अधिकाऱ्यांनी शिवरायांचा जयजयकार केला आहे. इस्राईलच्या दुतावासाने एक ट्विट करत शिवजयंतीच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. या ट्विटमध्ये राज्यातील शिवजयंती सोहळ्याचा व्हिडीओ ट्विट करत या व्हिडीओच्या माध्यमातून इस्राईलच्या राजदुतांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, राज्यात आज (१९ फेब्रुवारी) छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा,आमदार प्रविण दरेकर आदी उपस्थित आहेत. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच शिवनेरीवर शिवजयंती साजरी करीत आहेत.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number