अकरावी प्रवेशाबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय घेण्यात येणार असलेल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
वर्षा गायकवाड म्हणाल्या, “ऑनलाइन अभ्यासक्रमाबाबत सातत्याने प्रश्न विचारला जातोय की, अभ्यासक्रम कधीपासून सुरु होणार आहे. अकरावीचे काही प्रवेश बाकी आहेत. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली होती. त्यानंतर शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून अकरावीची प्रवेश प्रक्रिया थांबवण्यात आली होती.
त्यामुळेच गेल्या दोन महिन्यांपासून ऑनलाईन अॅडमिशन होऊनही अर्धी रखडलेली प्रवेश प्रक्रिया आता पूर्ण होण्याची शक्यता आहे कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच महाअधिवक्त्यांशी चर्चा करणार आहे. त्यानंतर येत्या दोन दिवसांत याबाबत निर्णय घेतला जाईल.” असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.