राहुल गांधींना निवडून देणं हा विनाशकारी निर्णय- गुहा

भारताच्या विकासात केरळचं मोठं योगदान आहे. मात्र राहुल गांधी यांना खासदार म्हणून निवडून देण्याचा निर्णय विनशकारी होता असं विधान सुप्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी केलं आहे. ते राष्ट्रवाद विरुद्ध अंधराष्ट्रवाद या विषयावर केरळ साहित्य संमेलनातील व्याख्यानात बोलत होते. मोदी विरोधक मानल्या जाणाऱ्या रामचंद्र गुहा यांनी राहुल गांधींवर केलेल्या टिकेमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. राहुल गांधी […]

राहुल गांधींना निवडून देणं हा विनाशकारी निर्णय- गुहा

भारताच्या विकासात केरळचं मोठं योगदान आहे. मात्र राहुल गांधी यांना खासदार म्हणून निवडून देण्याचा निर्णय विनशकारी होता असं विधान सुप्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी केलं आहे. ते राष्ट्रवाद विरुद्ध अंधराष्ट्रवाद या विषयावर केरळ साहित्य संमेलनातील व्याख्यानात बोलत होते.

मोदी विरोधक मानल्या जाणाऱ्या रामचंद्र गुहा यांनी राहुल गांधींवर केलेल्या टिकेमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. राहुल गांधी यांना निवडून देण्याचा केरळच्या जनतेचा निर्णय विनाशकारी असल्याची टीका गुहा यांनी केली.

काय म्हणाले गुहा?

राहुल गांधी यांच्याशी माझं व्यक्तिगत पातळीवर कोणतंही वैर नाही.

ते सभ्य आणि सुसंस्कृत आहे.

मात्र लोकांना काँग्रेसमधील गांधी घराण्याच्या घराणेशाहीचा वीट आलाय.

स्वातंत्र्यलढ्यात एक महान पक्ष ठरलेली काँग्रेस आता मात्र केविलवाणी घराणेशाही कंपनी बनून गेली आहे.

गांधी घराण्यातील पाचव्या पिढीचे सदस्य असणारे राहुल गांधी यांचं नरेंद्र मोदींपुढे कोणतंही आव्हान नाही.

2024 मध्ये पुन्हा राहुल गांधींनाच नोदींविरोधात उभं केलं, तर मोदींनाच त्याचा फायदा होईल, अशी शक्यता रामचंद्र गुहा यांनी वर्तवली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number