Raju Patil : " … म्हणून आम्ही पाठिंबा दिला" ; राजू पाटलांनी सांगितली युतीची इनसाईड स्टोरी

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मनसेशी हातमिळवणी केली आहे. याचपार्श्वभूमिवर मनसे नेते राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Raju Patil : &quot … म्हणून आम्ही पाठिंबा दिला&quot ; राजू पाटलांनी सांगितली युतीची इनसाईड स्टोरी

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मनसेशी हातमिळवणी केली आहे. बुधवारी कोकण भवन येथे खासदार श्रीकांत शिंदे आणि मनसे नेते राजू पाटील यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची गट नोंदणी पार पडली. या नव्या आघाडीमुळे कल्याण-डोंबिवलीत महायुतीसोबतच 'मनसे' सत्तेत सहभागी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचपार्श्वभूमिवर मनसे नेते राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

हेही वाचा- Naresh Mhaske On KDMC : शिंदेंची खेळी, शेवटी भाजपला रोखलं; मनसेसोबत युतीबाबत नरेश म्हस्के यांचा मोठा खुलासा
यावेळी राजू पाटील म्हणाले की, "भाजपा 50 आणि शिंदे यांची शिवसेना 53 होती अरे इतके दिवस केडीएमसी मध्ये जो खेळ चालू होता आकडेमोड पळवा पळवी. ज्या सोबतच भविष्यामध्ये पण ज्या निवडणुका असतात समित्यांच्या त्यामध्ये देखील गोंधळ होण्याची शक्यता आहे. अशावेळी कुठलातरी एक बाजू स्टेबल राहावी या हेतुने पाठिंबा दिलेला आहे. शिवसेना शिंदे आणि बीजेपी एकत्र लढले आहेत त्यामुळे त्यांना समर्थन देऊन आम्ही त्यांच्यासोबत जात आहोत. सत्तेत असल्यावर काम झाली बस झाली आम्हाला विकास कामे होण्यासाठी आम्ही पाठिंबा दिलेला आहे. सुरुवातीला काही नागतसेवक गायब झाले अश्यावेळी आम्हाला आमच्या नगरसेवकांची देखिल चिंता होती. हा स्वतःच्या स्वार्थासाठी घेतलेला निर्णय नाही आम्ही ठामपणे समोर आलेलो आहोत. राज ठाकरेंनी देखिल स्थानिक पातळीवर तुम्ही नॉर्णय घ्या असे सांगितले त्यानुसार आम्ही निर्णय घेतला. मला kdmc मधील जनतेला सवाल 5 लोकांमध्ये आम्ही जनतेला न्याय देऊ शकलो असतो का त्यामुळे सत्तेत राहून आम्ही आमचा अंकुश ठेवणारच  ना…. आम्ही काय त्यांचं सरकार पडू शकत नाही पण आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्राम घेऊनच जाणार आहोत. काही गोष्टी घडल्या तिथे ज्यामुळे आमचे उमेदवार पाडले पण तो स्थानिक नेतृत्वाचा विषय वरिष्ठाचा यात दोश नाही". 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number