‘शिंदे मुख्यमंत्री व्हावेत ही महाराष्ट्राची इच्छा’

शिंदे मुख्यमंत्री व्हावेत ही महाराष्ट्राची इच्छा असल्याचे वक्तव्य शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांनी केले आहे.

‘शिंदे मुख्यमंत्री व्हावेत ही महाराष्ट्राची इच्छा’

नाशिक : महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचे वेग सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुती घवघवीत यश प्राप्त झाले आहेत. महायुतीमधील भाजपाला 132, शिवसेनेला 57, राष्ट्रावादी काँग्रेसला 41 जागांवर बहुमत मिळाले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री पदाची आता प्रतिक्षा आहे. शिंदे मुख्यमंत्री व्हावेत ही महाराष्ट्राची इच्छा असल्याचे वक्तव्य शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांनी केले आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी 2 वर्षात धाडसी निर्णय घेतले असल्याचीही प्रतिक्रिया गोडसे यांनी माध्यमांना दिली आहे.

काय म्हणाले हेमंत गोडसे ?

संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा की शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावेत. वरिष्ठ पातळीवर चर्चा होतील. मात्र शिंदे साहेबांनी 2 वर्षात अनेक धाडसी निर्णय घेतले. त्यामुळे महायुतीला लोकाभिमुख काम करता आले. 16 तास काम करणार मुख्यमंत्री आहेत. सर्वसामान्य माणसाची आणि आमची देखील इच्छा आहे की शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावेत. ज्यांनी जितक्या जागा लढल्या तेवढ्या जागा निवडून आल्या आहेत. स्ट्राईक रेट सगळ्यांचा चांगला आहे. पुढील काळात पालकमंत्री शिवसेनेचा असावा अशी आमची मागणी आहे. सत्तेत महायुती आहे. शिवसेनेचा पालकमंत्री असला तर कुंभमेळा चांगला पार पडेल असे वाटते. 

 

विधानसभा निवडणुक झाल्यानंतर मुख्यमंत्री पदीचे वारे वाहू लागले आहे. राज्यात नवा मुख्यमंत्री कोण असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. महायुतीमध्ये भाजपाला सर्वाधिक बहुमत असल्याने भाजपाचा मुख्यमंत्री बनला पाहिजे असे भाजपा पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना वाटत आहे. तर दुसरीकडे शिवसेना पक्षाही विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा असे शिंदेंच्या नेते आणि कार्यकर्त्यांना वाटत आहे. सध्या महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांची पसंती वाढताना दिसत आहे. सर्व स्तरातून शिंदे मुख्यमंत्री व्हावेत अशा चर्चा पाहायला मिळत आहेत.  

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number