2019 ला सत्तेसाठी उबाठाने बाळासाहेबांच्या विचारांना, हिंदुत्वाला केलं डॅमेज

 उपमुख्यमंत्री शिंदे यांची उबाठावर घणाघाती टीका – महायुतीचा विकास अजेंडा<br/>

 2019 ला सत्तेसाठी उबाठाने बाळासाहेबांच्या विचारांना, हिंदुत्वाला केलं डॅमेज

मुंबई: सत्तेच्या खुर्चीसाठी 2019 मध्येच त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना डॅमेज केले, हिंदुत्वाला डॅमेज केले, शिवसेनेला डॅमेज केले, आता आभाळ फाटलंय त्याला कुठे कुठे ठिगळ लावणार, अशी घणाघाती टीका शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केली. उबाठाच्या डॅमेज कंट्रोलबाबत विचारलेल्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी खिल्ली उडवली. मुंबईत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

महाविकास आघाडीसारखा खुर्चीचा अजेंडा नाही तर महायुतीचा अजेंडा हा सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये बदल घडवणे आणि त्यांना न्याय देणे, राज्याला पुढे नेणे आहे. राज्यातील महत्वाच्या पायाभूत सेवा प्रकल्पांचा आढावा घेणारी एकच वॉर रुम आहे. नवीन वॉर रुम झालेली नाही. शिवसेनेच्या मंत्र्यांकडील खात्यांचा आढावा घेण्यासाठी समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. हा कक्ष वॉर रुमशी संलग्न आहे. त्यामुळे महायुतीत कोल्ड वॉर नाही तर महाराष्ट्र विकास विरोधी लोकांशी वॉर आहे, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.

शासन निर्णय 31 ऑक्टोबर 2023 नुसार उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. ते पुढे म्हणाले की या राज्याचा विकास करणे हाच महायुतीचा अजेंडा आहे. महायुतीमध्ये कोणतीही समांतर यंत्रणा नाही. उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायत्ता कक्षात वैद्यकीय मदतीचे जे अर्ज येतील, त्यांना मदत केली जाईल. यापूर्वी काहीजण मुख्यमंत्री असताना एकदाच मंत्रालयात आले होते याची आठवण उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी करुन दिली. महाकुंभसाठी शिवसेनेचे नेते प्रयागराजला जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

?? हे देखील वाचा : मंत्र्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश पाळू नका, असा मंत्र महायुतीतून कोणी दिला?

शिवसेना पक्ष हा बाळासाहेबांच्या विचारांचा आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. हा पक्ष कार्यकर्त्यांना बळ देणारा आहे. “तुम लढो हम कपडा संभालता है” या विचारांचा नाही, असे उपमुख्यमंत्री म्हणाले. आज शिवसेनेत मोठ्या संख्येने लोक येत आहेत त्यांचे आम्ही स्वागत करतोय पण ज्यांना सोडून लोक जात आहेत त्यांनी त्यावर आत्मपरिक्षण करायला हवे, असा सल्ला शिंदे यांनी दिला. बंद पडलेल्या किंवा दिवाळखोरीत गेलेल्या कारखान्यांच्या कामगारांना लवकरात लवकर थकीत देणी मिळावीत, यासाठी राज्याच्या ‘एमआयडीसी’कडून स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number