Eknath Shinde vs Ganesh Naik: कार्यक्रम पत्रिकेवरुन वाद पेटला! एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक संघर्ष चव्हाट्यावर

अशातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. 

Eknath Shinde vs Ganesh Naik: कार्यक्रम पत्रिकेवरुन वाद पेटला! एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक संघर्ष चव्हाट्यावर

राज्याच्या राजकारणात नेहमीच काही ना काही घडामोडी घडत असतात. अशातच आता नवी मुंबई महानगरपालिकेच्या पत्रिकेवरून वाद पेटला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मुबंईच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना डावललं गेलं आहे. त्यामुळे मोठा वाद उफाळला आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील वाद पुन्हा एदा समोर आला आहे. 

एकनाथ शिंदे यांचं नाव काही पहिल्यांदाच वगळण्यात आलं नाही, असं वक्तव्य नरेश म्हस्के यांनी केलं. नवी मुंबईतील विमानतळावर शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला होता. मात्र या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण देण्यात आलं नव्हते. त्यामुळे शिवसेना नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.  आज शाळांचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक नवी मुंबईतील एका शाळेत आले होते. यावेळी याबाबत विचारणा केली असता त्यांनी स्पष्ट केले की, “या विषयी मला कोणतीही माहिती नाही, याबाबत महापालिका आयुक्तांकडे चौकशी करावी.”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number