Eknath Shinde Viral Video : एकनाथ शिंदेंनी मालवणात पैशांच्या बॅगा आणल्या, ठाकरे गटाकडून व्हिडीओ शेअर

संजय राऊत यांनीदेखील सोशल मिडीयावर व्हिडीओ पोस्ट शेअर केला आहे.

Eknath Shinde Viral Video : एकनाथ शिंदेंनी मालवणात पैशांच्या बॅगा आणल्या, ठाकरे गटाकडून व्हिडीओ शेअर

एकीकडे निलेश राणेंनी भाजप पक्षावर मतदारांना पैसे  वाटल्याचे आरोप केले परंतु निलेश राणे आणि शिंदे- शिवसेना देखील धुतल्या तांदळासारखी नाही. परवा एकनाथ शिंदे मालवणात आले तेव्हा त्यांच्या मागून त्यांचे बॉडीगार्ड पैशाच्या बॅगा घेऊन कॅमेरा पासून लपण्यासाठी धावत आहेत हे वरील व्हिडीओत स्पष्ट दिसून येत आहे. हेच पैसे काल  निलेश राणेंनी मालवण मधील मतदारांना वाटले आहेत. राज्यात सत्तेत राहून जनतेच्या पैशात भ्रष्टाचार करून मिळविलेला हा पैसा आहे. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हेच धोरण सध्या शिंदे- शिवसेनेकडून प्रत्येक निवडणुकीत राबविले जात आहे. असा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी मालवणच्या जनतेने विचार पूर्वक मतदान करावे असे  आवाहन वैभव नाईक यांनी मालवणच्या जनतेला केले आहे. असे सोशल मीडियावर एक व्हिडिओ वैभव नाईक यांनी व्हायरल करत मोठा खळबळजनक आरोप केला आहे.

यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीदेखील सोशल मिडीयावर व्हिडीओ पोस्ट शेअर केला आहे. त्यांनी व्हिडीओ करत लिहिले की, ‘शिंदे मालवणात आले येताना बॅगेतून काय आणले? मालवणात भाजपाच्या थैल्याना बॅगेने उत्तर! या आधी नाशिक मध्ये ही बॅगा उतरल्याच होत्या लोकशाही ची ऐशी की तैशी? जय महाराष्ट्र!’


 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number