महाराष्ट्रात ऑपरेशन टायगरची चर्चा रंगली आहे. ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू असतानाच दोन्ही शिवसेना पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या डिनेर डिप्लोमसीला शिवसेना ठाकरे गटाच्या दोन खासदारांनी उपस्थिती लावल्याने राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी डिनर आयोजित केले होते. शिवसेना ठाकरे गटाचे नांदेडचे खासदार नागेश आष्टीकर आणि यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख यांनी शिवसेना शिंदे गटाच्या प्रतापराव जाधव यांच्या स्नेहभोजनाला उपस्थिती लावली.
हेही वाचा- Sunetra Ajit Pawar : आताची मोठी राजकीय बातमी! सुनेत्रा पवार वेगळ्याच राजकीय पवित्र्यात?
त्यांच्यासोबत ठाकरेंचे आणखी काही खासदार शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या दोन खासदारांनी शिवसेना शिंदे गटाच्या डिनेर डिप्लोमसीला उपस्थिती लावल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. 2029 च्या निवडणुकीसाठी शिंदेंकडून रणनिती ठरली असून किमान 19 जागांवर एकनाथ शिंदे दावा करणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र शिवसेना शिंदेंकडे 7 खासदार आहेत. अशातच ठाकरे गटाच्या खासदारांनी शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या घरी जाणे ही बाब राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.