Eknath Shinde Shivsena: एकनाथ शिंदेंची मोठी खेळी! मंत्र्यांकडे जिल्ह्यांची सूत्रं, संपर्कप्रमुखांची नवी यादी जाहीर; पाहा कोणाकडे कोणता जिल्हा?

प्रत्येक मंत्र्याकडे दोन जिल्ह्यांची जबाबदारी देत पक्षबांधणी मजबूत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Eknath Shinde Shivsena: एकनाथ शिंदेंची मोठी खेळी! मंत्र्यांकडे जिल्ह्यांची सूत्रं, संपर्कप्रमुखांची नवी यादी जाहीर; पाहा कोणाकडे कोणता जिल्हा?

मुंबई: राज्याच्या राजकारणात सध्या घडामोडींना वेग आला असून, शिवसेना शिंदे गटाने संघटनात्मक पातळीवर मोठा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संपर्कप्रमुखांची नवी यादी जाहीर करण्यात आली आहे. या निर्णयानुसार प्रत्येक मंत्र्याकडे दोन जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली असून, पक्षबांधणीसाठी ही महत्त्वाची पावले मानली जात आहेत.

या यादीत मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे गडचिरोली आणि चंद्रपूर, तर दादा भुसे यांच्याकडे धुळे आणि बुलढाणा जिल्हे सोपवण्यात आले आहेत.

याशिवाय मंत्री गुलाबराव पाटील हे जळगाव आणि नंदुरबार, उदय सामंत हे नाशिक आणि अहिल्यानगर, तर योगेश कदम हे ठाणे आणि पालघर जिल्ह्यांचे संपर्कप्रमुख म्हणून काम पाहणार आहेत.

हेही वाचा: Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेत ‘बोगस भावांचा’ डल्ला! 12 हजार पुरुषांनी सरकारला लावला 23 कोटींचा चुना; वसुलीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष?

तसेच प्रकाश आंबेडकर यांच्याकडे नांदेड आणि हिंगोली, भरत गोगावले यांच्याकडे बीड, आशिष जैस्वाल यांच्याकडे जालना, प्रताप सरनाईक यांच्याकडे अमरावती आणि अकोला, संजय राठोड यांच्याकडे यवतमाळ आणि वाशिम, तर संजय शिरसाट यांच्याकडे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

या निर्णयामुळे आता संबंधित मंत्र्यांना त्यांच्या जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाजावर लक्ष ठेवून पक्षाला नियमित माहिती द्यावी लागणार आहे. जिल्हानिहाय संपर्कप्रमुख नेमल्यामुळे स्थानिक पातळीवर पक्ष अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एकूणच, पक्षबांधणीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला हा निर्णय आगामी राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा: Stock Market Today: दलाल स्ट्रीटवर ‘ऑल इज नॉट वेल’; सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, निफ्टीही गडगडला

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number