Eknath Shinde : ‘VSR विमानात बसणार नाही…’, शिवसेनेच्या नेत्यांचा मोठा निर्णय, नेमकं कारण तरी काय?

VSR कंपनीची चौकशी करण्यात यावी अशी मागणीदेखील करण्यात आली. अशातच आता शिवसेनेने एक मोठी घोषणा केली आहे. 

Eknath Shinde : ‘VSR विमानात बसणार नाही…’, शिवसेनेच्या नेत्यांचा मोठा निर्णय, नेमकं कारण तरी काय?

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. मात्र हा अपघात नसून घातपात असल्याची शंका अनेकांनी उपस्थित केली. त्याचप्रमाणे आमदार रोहित पवार यांनी VSR कंपनीची चौकशी करण्यात यावी अशी मागणीदेखील करण्यात आली. अशातच आता शिवसेनेने एक मोठी घोषणा केली आहे. 

शिवसेना शिंदे गटाचे नेते, मंत्री हे आता व्हीएसआरचे‌ विमान वापरणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. शिंदे गटाच्या आमदारांची सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून  मान्य करण्यात आल्याची माहिती आहे.  संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या व्हीआरएस कंपनीबाबत सातत्याने नवंनवीन दावा करण्यात येत आहे. 

हेही वाचा – Cab Women Safety : कॅबमधील महिलांच्या सुरक्षेसाठी असणारे SOS Button खरंच काम करते का? समोर आला धक्कादायक व्हिडीओ 

या सर्व पार्श्वभूमीवर व्हीएसआर कंपनीचे विमान न वापरण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या आमदारांनी या संदर्भात एकनाथ शिंदेंकडून सूचना केल्या होत्या. अशातच या मागणीचे गांभीर्य लक्ष्यात घेता हि मागणी मान्य केली आहे. त्यामुळे यापुढे शिंदे गटाचे नेते, मंत्री व्हीएसआरचे‌ विमान वापरणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number