Shivsena Dasara Melava : शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचं ठिकाण ठरलं; जाणून घ्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज पत्रकार परिषदेत घेतली. या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अधिकृत माहिती दिली की, 'शिवसेना दसरा मेळाव्याचे ठिकाण बदलल्यात आले आहे'.

Shivsena Dasara Melava : शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचं ठिकाण ठरलं; जाणून घ्या
मुंबई: राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील आझाद मैदानाऐवजी गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये होणार आहे. याची अधिकृत माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज पत्रकार परिषदेत दिली. एकनाथ शिंदे म्हणाले की, 'काही दिवसांपासून राज्यातील काही जिलह्यात मोठा पूर आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकनान झाले आहे. त्यामुळे, शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांना आणि शिवसैनिकांना पूरग्रस्त ठिकाणी जाऊन नुकसानग्रस्त लोकांना मदत करण्याच्या सूचना देण्यात आले आहे. यंदाचा दसरा मेळावा आझाद मैदानाऐवजी नेस्को सेंटरमध्ये होणार आहे'. त्यामुळे, यंदाच्या शिवसेना दसरा मेळाव्यात शिवेसेनेचे काही पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित राहणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यातील पूरपरिस्थितीबाबतही भाष्य केले. एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘राज्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसहित आम्ही सर्व मंत्र्यांनी देखील ज्याठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे, त्याठिकाणी भेट दिली. पूरग्रस्त गावांची पाहणी केल्यानंतर असे आढळून आले की, पूरपरिस्थिती आणि शेतकऱ्यांचं संकट खूप मोठा आहे. शेतकऱ्यांसोबत संवाद साधताना त्यांच्या वेदना जाणवत होत्या. या भेटीदरम्यान, त्यांनी आम्हाला माहिती दिली की, गेल्या अनेक वर्षांमध्ये अशा प्रकारची पूरपरिस्थिती, अशा प्रकारचा पाऊस आणि ढगफूटी कधीही पडला नाही. त्यामुळे, संकट मोठा आहे. अशा परिस्थिती शेतकऱ्यांच्या मागे सरकार खंबीरपणे उभा राहील. जेव्हा कधी संकट आलं तेव्हा शेतकऱ्यांच्या मागे सरकार उभा राहिला आहे. त्यामुळे आज कॅबिनेटमध्ये याबाबतीत चर्चा झाली. पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करताना सरकार हात आखडता घेणार नाही’. 

हेही वाचा: Dasara Melava 2025: राज्यात दसरा मेळाव्यांची जय्यत तयारी सुरू; ‘या’ 5 दसरा मेळाव्यांमुळे विजयादशमीच्या दिवशी राजकीय वातावरण तापणार

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number