Eknath Shinde on Mangesh Kalokhe Death Case: ‘या केसवर माझं लक्ष, ठेचून काढू!’, मंगेश काळोखे प्रकरणात एकनाथ शिंदेंची आक्रमक भूमिका

मुख्य आरोपी रवींद्र देवकर आणि त्याचा मुलगा दर्शन देवकर यांना पोलिसांनी अटक केली आहे.

Eknath Shinde on Mangesh Kalokhe Death Case: ‘या केसवर माझं लक्ष, ठेचून काढू!’, मंगेश काळोखे प्रकरणात एकनाथ शिंदेंची आक्रमक भूमिका

रायगड जिल्ह्यातीतल खोपोली नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची 26 डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, रवींद्र देवकर, दर्शन देवकर यांच्यासह 10 जणांवर गुन्हा दाखल केला. तर, मुख्य आरोपी रवींद्र देवकर आणि त्याचा मुलगा दर्शन देवकर यांना पोलिसांनी अटक केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी काळोखे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. एकनाथ शिंदेंना भेटताच काळोखे कुटुंबीयांचे अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी काळोखे कुटुंबीयांनी केली. त्यावर आपण काळोखे कुटुंबीयांच्या मागे ठामपणे उभे असून कुणालाही सोडणार नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले.आरोपींवर मोका लावा, त्यांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी काळोखे कुटुंबीयांनी यावेळी केली.

एकनाथ शिंदे म्हणाले की, “मी काळोखे परिवाराच्या मागे उभा आहे. लोकांनी ज्यांना विजयी केलं त्यांच्याविरोधात सूडाचं राजकारण करण्यात आलं. अशी घटना परत घडता कामा नये. माझं या केसवर लक्ष आहे. मी बघतो काय करायचं ते. कुणालाही सोडणार नाही, आरोपींना ठेचून काढू. असे ते म्हणाले.  त्याचप्रमाणे या प्रकरणात ज्या पोलीस अधिकाऱ्याने दुर्लक्ष केलं त्या सचिन हिरेंना ताबडतोब निलंबित करा अशी मागणी यावेळी एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली.

 

 

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number