Eknath Shinde : अजित पवारांच्या पुण्यात एकनाथ शिंदे कडाडले; लाडकी बहीण योजनेबाबत केलं मोठं वक्तव्य

आज पुण्यातील कात्रज येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा पार पडली.

Eknath Shinde : अजित पवारांच्या पुण्यात एकनाथ शिंदे कडाडले; लाडकी बहीण योजनेबाबत केलं मोठं वक्तव्य

पुणे : मुंबईसह राज्यात 29 महापालिकांच्या निवडणुकांसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रीया पार पडणार आहे. राज्यातील या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्व मातब्बर नेते मैदानात उतरले आहेत. आज पुण्यातील कात्रज येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा पार पडली. या सभेत त्यांनी विरोधकांवर सडकून टीका करतानाच आपल्या कामाचा पाढादेखील वाहून दाखवला.

या सभेत एकनाथ शिंदे म्हणाले की, आपले सर्व उमेदवार निवडून द्या. आज माझ्या लाडक्या बहिणी उपस्थित आहेत. लाडक्या बहिणींची संख्या प्रत्येक सभेला, प्रत्येक रॅलीमध्ये पाहत आहे. विधानसभेला नगरपरिषदेला बहिणीची संख्या लाक्षणिक वाढली आहे. ज्या उमेदवारांच्या मागे महिला त्यांचा मतपेटीमध्ये नंबर पहिला. हा चमत्कार आपण विधानसभेला पाहिला, नगरपरिषदेला पाहिला, तो चमत्कार महापालिकेला दिसेल. महानगरपालिकेला आपल्याला चौकार मारायचा आहे. आपलं पुणे विद्येच माहेरघर आहे. विकासाचं अमृत आपल्याला पुण्याला द्यावं लागेल. आपला अजेंडा विकास हाच आहे. माझ्या मुखमंत्रीपदाच्या कारकीर्दीत पुण्याला भरभरून दिलं. कात्रजचा पूलदेखील आपल्याला करायचा आहे. आपण शिवसेना स्वःबळावर लढत आहोत. मी विधानसभा निवडणुकीत पहिल्या भाषणात सांगितलं होतं की, २०५ आणून दाखवणार, आपण 232 आमदार आणले. मला गोळ्या इंजेक्शन सगळे माहिती. काय करायचं हे शेवटी जनता ठरवेल. एकनाथ शिंदे बोलतो ते करतो. माझ्या लाडक्या बहिणी साक्षीदार आहेत. मी मुख्यमंत्री असताना अनेक योजना आणल्या. सत्ता आली की, मी सगळ्यांसाठी काम करतो. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या. स्वतः एकनाथ शिंदे तुमचा लाडका भाऊ तिथे बसला होता. म्हणून लाडकी बहीण योजना सुरू केली. लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, हा माझा तुम्हाला शब्द आहे. एक बार जो मैने कमेंट कर दी तो मे किसी की भी नही सुनता. शिवसेना एकटी लढत आहे. म्हणून सेनेला हलक्यात घेऊ नका, शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराची आहे. आमचा धनुष्यबाण हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. शिवसेनेचा धनुष्यबाण पुण्यात जलवा दाखवणार आणि भगवा फडकवणार. कुणी कुणाला कमजोर समजू नका. पुणं तिथं शिवसेना उणं आहे, ही कमतरता तुम्हाला भरून काढायची आहे. आपल्याला इथे बेरजेचं राजकारण करायचं आहे. काल आमच्या कार्यकर्त्यांवर आणि उमेदवारांवर हल्ला झाला. असलं डरपोक राजकारण करू नका, आम्ही भीत नाही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडी कुठेच दिसली नाही. कार्यकर्त्यांना वाऱ्यावर त्यांनी सोडलं.

हेही वाचा : BJP Vs Shivsena Shinde : 50 खोके एकदम ओके…, शिंदे सेनेविरोधात भाजप कार्यकर्त्यांच्याच घोषणा; महायुतीमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर

शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. मी कॉमन मॅन आहे. ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. निवडणुकीत यांना जपा. कार्यकर्त्यांना मानसन्मान मिळायला पाहिजे. माझ्या लाडक्या बहिणींना मान सन्मान मिळाला स्वतःच्या पायावर त्या उभ्या टाकत आहेत. आम्ही आपल्या नावात आईचं नावदेखील आणलं. हा निर्णय आपल्या सरकारने घेतला. मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय आम्ही घेतला. युवकांसाठी ज्येष्ठांसाठी निर्णय घेतले. पुण्यात छोट्या घरांवरचा टॅक्स आपण माफ करून टाकू, हा माझा शब्द आहे. कारण देत नाही, ऑन द स्पॉट डिसीजन घेतो. महायुतीचे 232 आमदार निवडून आले. इतिहासात एवढा मोठा विजय पहिल्यांदा झाला. आपण कात्रजचा विकास आराखडा तयार करू सर्वांना लक्षात घेऊन सर्वसमावेशक असा विकास आराखडा तयार करू. वाहतूकमुक्त पुणे आपल्याला करावं लागेल. वाहतूक मुक्त कात्रज आपल्याला करावं लागेल. त्यासाठी जे जे करायचं आहे ते आपण करू. अनेक समस्या पुण्यात आहेत त्या सोडवू. गेली अनेक वर्ष ही लोकं पुण्यात सत्तेत आहेत. त्यांनी काही केलं नाही. आपण सोडवू. सगळे रस्ते तयार करू. जो काही निधी लागेल तू विकास निधी देऊ आणि कामे मार्गी लावू. कात्रज विकास आघाडी म्हणून लढू. कात्रजची सगळी काम करू, नगर विकास खात्याच्या माध्यमातून जे काही करता येईल ते सगळं करू, असं शिंदे म्हणाले. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number