Eknath Shinde: शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून महायुतीत खळबळ? मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचा संताप, मुख्यमंत्र्यांनी थेट….

नवी मुंबईतील विमानतळ परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यावरून राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले.

Eknath Shinde: शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून महायुतीत खळबळ? मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचा संताप, मुख्यमंत्र्यांनी थेट….

नवी मुंबईतील विमानतळ परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यावरून राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण देण्यात आले नसल्याचा मुद्दा आता थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत गाजला. शिवसेनेच्या मंत्र्यांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त नवी मुंबई विमानतळावर उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना या सोहळ्याचे निमंत्रण न दिल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली होती. शिवसेनेच्या नेत्यांनीही यावर नाराजी व्यक्त केली होती.

हेही वाचा: Laxman Hake Video : 'मी कुणालाच घाबरत नाही…'; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया समोर

याच पार्श्वभूमीवर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी हा विषय उपस्थित केला. राज्यातील महत्त्वाच्या सार्वजनिक कार्यक्रमात उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण न मिळणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी बैठकीत नमूद केले. तसेच या संपूर्ण प्रक्रियेत नेमकी चूक कुठे झाली याची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

बैठकीत सिडको, राजशिष्टाचार विभाग तसेच विमानतळ प्राधिकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांची भूमिकाही तपासण्याची मागणी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. कार्यक्रमाच्या निमंत्रण प्रक्रियेत दुर्लक्ष झाले की अन्य काही कारण होते, याची सखोल चौकशी व्हावी, अशी भूमिका शिवसेनेच्या मंत्र्यांनी मांडल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयाकडे दुर्लक्ष न करता संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता निमंत्रण प्रक्रियेत झालेल्या कथित त्रुटीबाबत प्रशासनाकडून अहवाल मागवला जाण्याची शक्यता आहे. चौकशी अहवालानंतर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: PM Narendra Modi: पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीची 12 वर्षे पूर्ण; सरकारच्या कामगिरीचा आढावा

दरम्यान, नवी मुंबई विमानतळाच्या विकासाशी संबंधित हा पुतळा विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर काही काळातच येथून विमानसेवाही सुरू झाली. त्यानंतर विमानतळ परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रशासनाने वेगाने काम पूर्ण करत अवघ्या पाच महिन्यांत पुतळा उभारल्याचे सांगितले जाते.

मात्र या अनावरण सोहळ्याच्या निमंत्रणावरून निर्माण झालेल्या वादामुळे राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. चौकशीच्या आदेशानंतर या प्रकरणात पुढे कोणती कारवाई होते आणि त्यातून काय निष्कर्ष समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number