राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीबद्दल एक अपडेट समोर आली आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास त्यांची तब्येत बिघडल्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. अशातच आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. शिंदे यांचा उद्या दिवस देखील हॉस्पिटलमध्ये राहण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. उद्याचा दिवस एकनाथ शिंदे विश्रांती घेतील, त्यांना मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाऊ शकतो, अशी माहिती आहे.
एकनाथ शिंदे उद्याच्या दिवशी म्हणजेच सोमवारी देखील हॉस्पिटलमध्ये राहण्याची शक्यता आहे. शिंदे यांना ताप आला असून प्रचंड अशक्तपणा असल्याने त्यांना अजून एक दिवस आराम करण्याचा कुटुंबाचा आणि डॉक्टरांचा सल्ला असल्याची माहिती आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याच बाबत एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीची माहिती आरोग्य मंत्री म्हणून प्रकाश आबिटकर यांनी पंढरपुरात दिली.शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीचे कौतुक करत त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, "मी शिवसेनेत प्रवेश केल्यापासून पाहत आहे की शिंदे साहेबांकडे कायम कार्यकर्त्यांची मोठी गर्दी असते. सामान्य कार्यकर्त्यालाही त्यांची भेट सहज मिळते. रात्री उशिरापर्यंत, अगदी बारा-एक-दोन वाजेपर्यंत ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत असतात. लोकांशी सतत संपर्क ठेवण्याची त्यांची ही सवय खरोखरच उल्लेखनीय आहे."
बच्चू कडू पुढे म्हणाले, "आम्ही त्यांना अनेकदा सांगतो की त्यांनी स्वतःसाठीही थोडा वेळ काढायला हवा. सतत कामाच्या धावपळीत राहिल्याने शरीरावर ताण येतो आणि आरोग्याच्या समस्या वाढू शकतात. ते 24 तास जनतेच्या सेवेत व्यस्त असणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. ते लवकर पूर्णपणे बरे व्हावेत आणि पुन्हा जोमाने लोकांच्या सेवेत रुजू व्हावेत, अशी मी मनापासून प्रार्थना करतो."