Eknath Shinde Health Update: मोठी बातमी! राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल, उपचार सुरू

त्यांची प्रकृती जास्तच बिघडली आणि त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले.

Eknath Shinde Health Update: मोठी बातमी! राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल, उपचार सुरू

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टागयरमध्ये व्यस्त होते. दरम्याने एकनाथ शिंदे  यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना शुक्रवारी ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात  दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ज्याचे पावसाळी अधिवेशन आणि ऑपरेशन टायगरदरम्यान त्यांची मोठी धावपळ सुरू होती.

 सततच्य दगदगीमुळे त्यांची प्रकृती बिघडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. विधिमंडळाचे कामकाज सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांना ताप आला होता. तोही त्यांनी अंगावर काढला. त्यानंतर त्यांची प्रकृती जास्तच बिघडली आणि त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याने सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. 

यानंतर एकनाथ शिंदे हे तातडीने ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. सध्या ते रुग्णालयातच असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही विशेष काळजी करण्याचे कारण नाही, असे शिवसेनेतील सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

धुळ्यातील ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांचा शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. शुभांगी पाटील यांना पक्षप्रवेश काल दुपारी चार वाजता नियोजित होता. मात्र, एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्यामुळे हा पक्षप्रवेशाचा सोहळा पुढे ढकलण्यात आला. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number