Vaibhav Naik On Eknath Shinde : "मालवणमध्ये शिंदेंनी पैशांच्या बॅगा आणल्या", वैभव नाईकांच्या टीकेवर दिपक केसरकर आक्रमक

राज्यात निवडणुकांचा ताण-तणाव वाढत असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर वैभव नाईकांकडून गंभीर आरोप करण्यात आला. यावर दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिल आहे.

Vaibhav Naik On Eknath Shinde : &quotमालवणमध्ये शिंदेंनी पैशांच्या बॅगा आणल्या&quot, वैभव नाईकांच्या टीकेवर दिपक केसरकर आक्रमक

आज राज्यातील 264 नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी मतदान होत असून सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे.सुरक्षिततेसाठी पोलिसांकडून संपूर्ण मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यात आले आहे. सुमारे आठ ते दहा वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असल्याने मतदारांमध्ये मोठी उत्सुकता आहे. उमेदवार आणि कार्यकर्त्यांनीही शक्तिप्रदर्शनासाठी मोठी मोहीम उभारल्याने वातावरण रंगतदार झाले आहे.

तर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा ताण-तणाव वाढत असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. यावेळी वैभव नाईक म्हणाले की, “दोन दिवसांपुर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा मालवणमध्ये होती. ज्यावेळेस ते हेलिकॉप्टरमधून येताना ज्या दोन मोठ्या बॅगा होत्या. त्या जड बॅगा कालरात्रभर मालवणमध्ये वाटत होते. एकनाथ शिंदेंचे शिवसैनिक भाजपवर पैसे वटपाचे आरोप करत होते. मात्र हे दोघेही एकाच नाण्याच्या बाजू आहेत. तुम्ही पैसे वाटून निवडणुका जिंकता आणि आता पण तुम्ही तेच केलत. याचा व्हिडिओ मी माझ्या सोशल मीडियावर अपलोड केला आहे.”

हेही वाचा- Eknath Shinde Viral Video : एकनाथ शिंदेंनी मालवणात पैशांच्या बॅगा आणल्या, ठाकरे गटाकडून व्हिडीओ शेअर

वैभव नाईक यांनी केलेल्या या आरोपावर राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले की, “अत्यंत चुकीचा आणि बेजबाबदारपणाचा हा आरोप आहे. शिंदे साहेब हे निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यावर होते. हेलिकॉप्टर  संध्याकाळच्या वेळेला हेलिकॉप्टर उडत नाही. त्याच्यामुळे हेलिकॉप्टरमधून उतरून मालवण ते वेंगुर्ला, आणि वेंगुर्ला ते सावंतवाडी, आणि सावंतवाडी ते मोपा हा प्रवास त्यांनी गाडीद्वारे केला. तिथून ते पुढच्या आपल्या सोलापूर दौऱ्याकडे रवाना झाले”.

“आता तुम्ही ज्यावेळी दौऱ्यावर असता, त्यावेळेला तुमच्या कपड्याच्या बॅगा तुमच्या सोबत असणारच. त्यांना पैशाच्या बॅगा म्हणणं याच्यासारखी चुकीची बाब दुसरी कुठलीच नाही. त्यांनी स्वतः खात्री करून घ्यावी की ते दौऱ्यावर होते आणि दौऱ्यावरच्या त्यांच्या स्वतःच्या, पीएच्या या बॅगा तर स्वतः घ्यायलाच लागतात, नाहीतर मग ते कपडे कसे बदलणार? पुढचा प्रवास कसा करणार? ही साधी गोष्ट आहे. त्याच्यातून असं काहीतरी खोटं बोलणं आणि एखाद्याची बदनामी करणं हे अत्यंत चुकीची आणि निषेधार्ह बाब आहे.” 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number