Eknath Shinde- Bacchu Kadu: प्रहार शिवसेनेत विलीन होणार? एकनाथ शिंदेंकडून बच्चू कडूंना विधान परिषदेची उमेदवारी मिळण्याची चर्चा, संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं

बच्चू कडू यांनीही विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

Eknath Shinde- Bacchu Kadu: प्रहार शिवसेनेत विलीन होणार? एकनाथ शिंदेंकडून बच्चू कडूंना विधान परिषदेची उमेदवारी मिळण्याची चर्चा, संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं

 सध्या विधान परिषदेची सर्वत्र धामधूम सुरू आहे.  विधानपरिषदेच्या 10  जागांवर निवडणूक होणार आहे. या जागांसाठी राज्यातील विविध नेत्यांकडून फिल्डिंग लावली जात आहे. बच्चू कडू यांनीही विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. परंतु शिवसेनेकडून विधानपरिषदेची उमेदवारी हवी असेल, तर प्रहार संघटना शिवसेनेत विलीन करा, अशी मागणी शिवसेनेची असल्याची माहिती मंत्री संजय शिरसाट यांनी दिली. 

येणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत अनेक इच्छुक आहेत, काही पक्षाकडून आहेत काही अपेक्षा आहेत.ज्यांचा राजकारणाशी संबंधित नाही तेही आहे. म्हणून अशी मागणी प्रत्येक पक्षाकडून केली जाते त्यापैकी बच्चू कडू एक आहेत. 

बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांची भेट किंवा आणखी कुणाला भेटले त्यामुळे चर्चा झाली असं काही म्हणायची गरज नाही.  जोपर्यंत एकनाथ शिंदे साहेब स्पष्टपणे सांगत नाही त्यामुळे कोणत्याही नावाला अर्थ नाही. दहा-बारा जणांनी आपली इच्छा एकनाथ शिंदे कडे व्यक्त केली आहे.

त्यांची संघटना विलीन करा किंवा नाही करा या सगळ्या बातम्या आहेत. त्यांना उमेदवारी दिली का त्यांचे नाव जाहीर केलं का? असं ते म्हणाले. त्यामुळे पुढे राजकारणात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number