Eknath Khadse : "होय, नगरपंचायत निवडणुकीत मी भाजपला मदत केली" एकनाथ खडसेंच खळबळजनक विधान

मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीवरून गुलाबराव पाटलांनी एकनाथ खडसेंवर गंभीर आरोप केले होते. यानंतर आता एकनाथ खडसेंनी देखील गुलाबराव पाटील यांच्या आरोपांवर पलटवार केला आहे. 

Eknath Khadse : &quotहोय, नगरपंचायत निवडणुकीत मी भाजपला मदत केली" एकनाथ खडसेंच खळबळजनक विधान

राजकीयवर्तूळात अनेक वाद समोर येत असताना मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीवरून मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंवर गंभीर आरोप केले होते. यामुळे मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीनंतर खडसे–पाटील संघर्ष कायम सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात असताना राष्ट्रवादीचा नेता भाजपसाठी काम करतो, हा कोणता पिक्चर आहे? असा घणाघात एकनाथ खडसेंवर केला होता. त्याचसोबत एकनाथ खडसेंनी जिल्ह्यातील अनेक नेत्यांना त्रास दिला असून आम्हाला जेलमध्ये टाकले. एवढेच नव्हे तर त्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना देखील त्रास दिला. असा आरोप केला होता. यानंतर आता एकनाथ खडसेंनी देखील गुलाबराव पाटील यांच्या आरोपांवर पलटवार केला आहे. 

हेही वाचा- Sanjay Shirsat On Imtiaz Jaleel : "इम्तियाज जलील साप, त्यांना ठेचायला हवे" इम्तियाज जलील यांच्या भूमिकेवर शिरसाटांची संतप्त प्रतिक्रिया
एकनाथ खडसे म्हणाले की, "होय, मी अनेकांना त्रास दिला, ही बाब खरी आहे. मात्र तो त्रास गुंड आणि भ्रष्ट लोकांना दिला, जिल्ह्यातच नाही तर जिल्ह्याबाहेरही जे भ्रष्टाचार करतात, गुंडगिरी करतात, त्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम मी केलं आहे आणि पुढेही करीन. गुलाबराव पाटील हे विसरले असतील, पण त्यांच्या आमदारकीच्या काळात प्रचारासाठी मी त्यांना मोठी मदत केली होती. आता गुलाबराव पाटील जे बोलत आहेत त्यांनी स्वतः आत्मचिंतन करावे"

हेही वाचा- Gold Price Prediction : सोने-चांदीचे दर लवकरच 21 टक्क्यांपर्यंत घसरणार? तज्ज्ञांचा मोठा दावा; 2026 च्या अखेरीस बाजारात होणार मोठे बदल
पुढे गुलाबराव पाटील यांनी मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीत भाजपला मदत केलेल्या विधानावर एकनाथ खडसे म्हणाले की, "होय, मी भाजपला मदत केली. खरं बोलायला काय आहे. मुक्ताईनगरच्या नगरपंचायत निवडणुकीत मी भाजपला मदत केली. एवढी वर्षे मंत्री असूनही गुलाबराव पाटील त्यांच्या गावची नगरपरिषद करू शकले नाहीत. त्यांनी यावर आत्मचिंतन करायला हवं" या आरोप-प्रत्यारोपामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून या वादाचे पडसाद आगामी निवडणुकीवर पडण्याची शक्यता आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number