Eknath Khadse: एकनाथ खडसेंना मोठा धक्का; साखर कारखान्याच्या नावाखाली जमीन लाटल्याचा आरोप; कन्या शारदा खडसेंसह गुन्हा दाखल

शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप असून या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Eknath Khadse: एकनाथ खडसेंना मोठा धक्का; साखर कारखान्याच्या नावाखाली जमीन लाटल्याचा आरोप; कन्या शारदा खडसेंसह गुन्हा दाखल

जळगाव: माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. साखर कारखाना उभारणीच्या नावाखाली जमीन खरेदी प्रकरणात खडसे आणि त्यांच्या मुलगी शारदा खडसे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील मानपूर परिसरात साखर कारखाना सुरू करण्याच्या उद्देशाने जमिनी खरेदी करण्यात आल्याचा आरोप आहे. या व्यवहारात शेतकऱ्यांच्या वतनाच्या जमिनीही खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भातील माहिती जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी दिली आहे. 

हेही वाचा: Expressway Traffic Jam : मुंबई-पुणे आणि मुंबई-अहमदाबाद हायवेवर भीषण वाहतूक कोंडी; हजारो प्रवासी तासनतास अडकले

या प्रकरणात एका महिला शेतकऱ्याने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. फिर्यादी महिलेचा आरोप आहे की, अशिक्षित असल्याचा फायदा घेत तिच्यासह इतर शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्यात आल्या. त्यानंतर प्रत्यक्षात मात्र तिथे कोणताही कारखाना उभा राहिलेला नाही. 

या तक्रारीनंतर पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या प्रकरणावर एकनाथ खडसे यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. पुढील काळात सरकार यावर काय भूमिका घेते, तसेच तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: IPL 2026 RR vs CSK : राजस्थानसमोर चेन्नईचं आव्हान! मात्र ‘हे’ 5 खेळाडू वाढवू शकतात चेन्नईची डोकेदुखी; यावेळी कोणाचं पारडं जड

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number