दहावीच्या निकालाबाबत महत्वाचा निर्णय

मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दहावीच्या परीक्षा घेण्याबाबत विचारणा केली होती. मात्र, राज्य सरकारनं परीक्षा न घेण्याची भूमिका कायम ठेवली. पण, तरीही परीक्षा विद्यार्थी आणि पालकामंध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झालेलं होतं. अखेर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी संभ्रम दूर केला असून, दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालासंदर्भात आणि अकरावीच्या प्रवेशाबद्दलची प्रक्रिया जाहीर केली आहे. दहावीच्या निकालासाठी १०० टक्के गुणांपैकी […]

दहावीच्या निकालाबाबत महत्वाचा निर्णय

मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दहावीच्या परीक्षा घेण्याबाबत विचारणा केली होती. मात्र, राज्य सरकारनं परीक्षा न घेण्याची भूमिका कायम ठेवली. पण, तरीही परीक्षा विद्यार्थी आणि पालकामंध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झालेलं होतं. अखेर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी संभ्रम दूर केला असून, दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालासंदर्भात आणि अकरावीच्या प्रवेशाबद्दलची प्रक्रिया जाहीर केली आहे. दहावीच्या निकालासाठी १०० टक्के गुणांपैकी ५० टक्के गुणांचे वेटेज दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनावर तर ५० टक्के गुणांचे वेटेज नववीच्या अंतिम परीक्षेच्या गुणांना देऊन विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाणार आहे.

‘राज्यातील करोना संसर्गामुळे मागील वर्षभरापासून आपल्या सर्वांसमोर अनेक आव्हानं निर्माण झालेली आहेत. कोरोना प्रादुर्भावामुळे मार्च-२०२१ पासून इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट असलेले विद्यार्थी, पालक आणि परीक्षेसंदर्भात काम करणारे घटक या सर्वांचे आरोग्य ही आमची सगळ्यात महत्वाची प्राथमिकता आहे, हे आम्ही सातत्याने सांगत आलेलो आहोत. म्हणूनच राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित केलेली इय़त्ता दहावीची परीक्षा रद्द करण्यासंदर्भातील निर्णय आम्ही राज्य मंत्रिमंडळाने घेतला’, असं वर्ष गायकवाड म्हणाल्या.

यामध्ये इयत्ता नववी आणि इयत्ता दहावीसाठी सुधारित शासन निर्णय दि.८ ऑगस्ट २०२० नुसार मूल्यमापन योजना निश्चित करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी इयत्ता दहावी परीक्षेचा अंतिम निकाल खालील निकषांच्या आधारे निश्चित करण्यात येईल.

नववीच्या निकालावर आधारीत ५० गुण
प्रात्यक्षिक तसेच तोंडी परीक्षेस २० गुण
लेखी मूल्यमापनाला ३० गुण
सीईटीच्या गुणांवर महाविद्यालयात प्रवेश
अकरावीच्या प्रवेशासाठी वैकल्पिक प्रवेश परीक्षा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number