Ashok Kharat Case: कोट्यवधी गोठवले, गाडीही केली जप्त; भोंदू अशोक खरात प्रकरणात ईडीची मोठी कारवाई

नाशिकमध्ये ईडी आणि आयकर विभागाने संयुक्त कारवाई करत अशोक खरात यांच्या ठिकाणी छापेमारी केली असून कोट्यवधींच्या मालमत्तेचे पुरावे हाती लागले आहेत.

Ashok Kharat Case: कोट्यवधी गोठवले, गाडीही केली जप्त; भोंदू अशोक खरात प्रकरणात ईडीची मोठी कारवाई

नाशिकमध्ये आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई करत अशोक खरात यांच्या निवासस्थानी छापा टाकला आहे. सोमवारी पहाटे सहा वाजल्यापासून कर्मयोगी नगर येथील ‘तृप्तबाला’ बंगल्यावर ही कारवाई सुरू असून, तब्बल 12 तासांहून अधिक काळ अधिकाऱ्यांकडून झाडाझडती सुरू होती. या कारवाईत ईडीसह आयकर विभागाचे अधिकारीही सहभागी असून, संयुक्तपणे तपास केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाच पुरुष आणि दोन महिला अधिकारी अशा सात जणांच्या पथकाने खरात यांच्या घराची सखोल तपासणी केली. बेनामी मालमत्ता, आर्थिक गैरव्यवहार आणि संशयास्पद व्यवहारांच्या संदर्भात कागदपत्रांची छाननी करण्यात येत आहे. या छापेमारीदरम्यान महत्त्वाचे पुरावे हाती लागल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

या प्रकरणात ईडीच्या हाती मोठे घबाड लागल्याचे समोर येत आहे. काल झालेल्या कारवाईत कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तांचे पुरावे मिळाल्याची चर्चा आहे. तसेच पुण्यातील प्रकाश पोफळे यांच्या निवासस्थानीही छापा टाकण्यात आला असून, तेथून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.याशिवाय, ईडीने अशोक खरात यांच्या बँक खात्यातील सुमारे 2 कोटी 50 लाख रुपये गोठवले आहेत. त्यांच्या ताब्यातील मर्सिडीज बेंझ ही आलिशान कारही जप्त करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात सुमारे 10 कोटी रुपयांच्या मालमत्तेची नोंद कागदपत्रांच्या आधारे आढळून आली आहे. या संपूर्ण कारवाईअंतर्गत नाशिकमध्ये पाच ठिकाणी, तर शिर्डी आणि पुणे येथे मिळून एकूण 11 ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू असून, पुढील काळात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number