शिवसेना आमदार रविंद्र वायकर यांची ईडीकडून ८ तास चौकशी

शिवसेना आमदार रविंद्र वायकर यांची ईडीकडून ८ तास चौकशी करण्यात आली. रविंद्र वायकर यांच्यावर आर्थिक अनियमिततेचा आरोप करण्यात आला आहे. तसे वायकर आणि ठाकरे यांच्यामध्ये व्यावसायिक संबंध असल्याचेही सांगण्यात येत आहे. आणि याच पार्श्वभूमीवर रविंद्र वायकर यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली असू याप्रकरणी अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत. रविंद्र वायकर यांची ईडीकडून आठ तास […]

शिवसेना आमदार रविंद्र वायकर यांची ईडीकडून ८ तास चौकशी

शिवसेना आमदार रविंद्र वायकर यांची ईडीकडून ८ तास चौकशी करण्यात आली. रविंद्र वायकर यांच्यावर आर्थिक अनियमिततेचा आरोप करण्यात आला आहे. तसे वायकर आणि ठाकरे यांच्यामध्ये व्यावसायिक संबंध असल्याचेही सांगण्यात येत आहे. आणि याच पार्श्वभूमीवर रविंद्र वायकर यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली असू याप्रकरणी अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत.

रविंद्र वायकर यांची ईडीकडून आठ तास चौकशी झाली असून ईडीला सर्व माहिती, कागदपत्रे दिली असल्याचे रविंद्र वायकर यांनी सांगितले आहे, तसेच ईडीच्या सर्व प्रश्नांवर स्पष्टीकरण दिले असल्याचेही ते म्हणाले.

रविंद्र रायकर हे जोगश्वरी मतदार संघातून शिवसेनेचे आमदार आहेत. रविंद्र वायकर हे फडणवीस सरकारच्या काळात गृहनिर्माण मंत्री होते. काही महिन्यांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वायकर यांच्या पत्नीचे नाव घेत जमिनी घोटाळ्याबाबत अनेक आरोप केले होते. यासर्वांनतंर आता रविंद्र वायकर यांची तब्बल आठ तास ईडी चौकशी करण्यात आली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number