ED, CBI आणि इन्कम टॅक्स ही भाजपची तीन अस्त्रं- राजू शेट्टी

ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स ही तीन भाजपची अस्त्रं आहेत. त्यांच्याच बळावर भाजपमध्ये मेगाभरती सुरू असल्याचे आरोप माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केला आहे. ते सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स हे मागे लावतो म्हणत किंवा भाजप आणि शिवसेनेत या असं म्हणून भाजप मेगाभरती करत आहे, असा आरोप […]

ED, CBI आणि इन्कम टॅक्स ही भाजपची तीन अस्त्रं- राजू शेट्टी

ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स ही तीन भाजपची अस्त्रं आहेत. त्यांच्याच बळावर भाजपमध्ये मेगाभरती सुरू असल्याचे आरोप माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केला आहे. ते सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.

ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स हे मागे लावतो म्हणत किंवा भाजप आणि शिवसेनेत या असं म्हणून भाजप मेगाभरती करत आहे, असा आरोप राजू शेट्टी यांनी केलाय.

तसंच केंद्रीय पथकाने पूरग्रस्तांची थट्टा केली आहे अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केली.

सांगली कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर पाहणी दौरयावर असलेल्या केंद्रीय पथकाच्या कारभारावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी जोरदार टीका केली.

वास्तविक पूर्व सल्ल्यानंतर तातडीने केंद्रीय पथक पाहणी करण्यासाठी यांना अपेक्षित होतं.

त्याचबरोबर केंद्रीय पथकाकडून साताऱ्यामध्ये शेतकऱ्यांना ऊस शेती वरून भात पीक लावण्याचा सल्ला केंद्रीय पथकाकडून देण्यात आला होता.

यावरून बोलताना दहा फूट उसाचे पीक पाण्यात बुडलं तिथे दोन फुटाचे भात पीक कसं राहिलं असतं,एवढी सुद्धा अक्कल नाही,अश्या शब्दात राजू शेट्टींनी केंद्रीय पथकाचे वाभाडे काढत,पूरग्रस्त शेतकऱ्यांची आणि जनतेची या केंद्रीय पथकाने थट्टा केल्याची टीका केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number