मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं तयार केलेल्या प्रचार गीताला राज्य निवडणूक आयोगानं परवानगी नाकारली आहे. महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं विशेष प्रचार गीत तयार केलं होतं. त्यात एका शब्दावरून प्रचार गीत नाकारण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाकडून प्रचारगीताबाबतही आचारसंहिता निश्चित करण्यात आली आहे. या निकषानुसार आक्षेपार्ह शब्दाचा वापर झाल्याचा ठपका ठेवत भाजपचं प्रचारगीत राज्य निवडणूक आयोगानं नाकारला आहे. भाजपच्या प्रचार गीतात भगवा शब्द असल्याचं कारण सांगण्यात आलं आहे. हे प्रचार गीत गायक अवधूत गुप्ते आणि गायिका वैशाली सामंत यांनी गायलं होतं. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाने भाजपला दणका दिला आहे.