शिवसेनेचा दसरा मेळावा बीकेसीत, शिउबाठाचा शिवाजी पार्कात

यंदा शनिवार १२ ऑक्टोबर रोजी शिवसेनेचा दसरा मेळावा बीकेसीत आणि शिउबाठाचा शिवाजी पार्कात होणार आहे.

शिवसेनेचा दसरा मेळावा बीकेसीत, शिउबाठाचा शिवाजी पार्कात

मुंबई : यंदा शनिवार १२ ऑक्टोबर रोजी शिवसेनेचा दसरा मेळावा बीकेसीत आणि शिउबाठाचा शिवाजी पार्कात होणार आहे. शिवसेनेच्या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिउबाठाच्या मेळाव्याला उद्धव मार्गदर्शन करणार आहे. राज्यात लवकरच होणार असलेल्या विधानसभा निवडणुकीला डोळ्यांपुढे ठेवून दोन्ही मेळाव्यांतून नेते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. मेळाव्यांच्या निमित्ताने दोन्ही पक्ष कोणत्या मुद्यांच्या आधारे विधानसभा निवडणुकीत प्रचार करणार हे स्पष्ट होईल. पोलीस आणि मुंबई महापालिकेकडून शिवसेना आणि शिउबाठाला त्यांच्या दसऱ्यानिमित्त होणार असलेल्या सभा घेण्यासाठी परवानगी मिळाली आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number