Sharad Sonawane Junnar : आमदार बिबट्याच्या वेशात विधानभवनात! राज्य सरकारकडे मोठी मागणी; "बिबट्यांना ती गोळी मारा…"

राज्यभरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. यावर जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी अनोख्या वेशात सरकारकडे बिबट्या हल्ल्यावर योग्य तो उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

Sharad Sonawane Junnar : आमदार बिबट्याच्या वेशात विधानभवनात! राज्य सरकारकडे मोठी मागणी; &quotबिबट्यांना ती गोळी मारा…&quot

राज्यभरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत अधिक लोकांचा बळी गेला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील जुन्नर, अहिल्यानगर, सोलापूर, नाशिक, धुळे, मुंबई, मराठवाडा आणि विदर्भातील नागपूर परिसरात बिबट्याची दहशत मोठ्या प्रमाणात पसरली आहे. बिबट्या हल्ल्याच्या भीतीपोटी लोक घरातून बाहेर पडायचे बंद झाले आहेत. इतच नव्हे तर मुलं शाळेमध्ये जात नाही, सर्वत्र बिबट्याची भीती पसरली असल्यामुळे रस्त्यावर कोणीच दिसत नाही.

हेही वाचा – Ganesh Naik On Leopard attack : बिबट्या हल्ले रोखण्यासाठी सरकारची नवी योजना! आता जंगलात सोडणार 1 कोटींच्या शेळ्या-बकऱ्या? गणेश नाईकांचा खुलासा

याचपार्श्वभूमिवर विधीमंडळात बिबट्याच्या संदर्भात चर्चा झाली आहे. बिबटे मानवी वस्तीत येऊ नये यासाठी सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहे. ज्यांचं नुकसान झालं, मृत्युमुखी पडले आहे, त्यांना शासन नोकरीत सामावून घेतील. बिबट्याच्या विषय चिंतेचा आणि महत्वाचा ठरतो आहे. अशातच जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी अनोख्या वेशात सरकारकडे बिबट्या हल्ल्यावर योग्य तो उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. यावेळी ते थेट बिबट्याचे वेशांतर करून विधिमंडळ परिसरात आल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा – Nagpur Leopard Rescue : नागपूरमध्ये बिबट्याला पकडण्याचा थरार; बचावकार्यात वन विभागाला यश

दरम्यान शरद सोनवणे मागणी करत म्हणाले की,  बिबट्याचे हल्ले वाढलेले असतानाही रोजच्या कारवाई व्यतिरिक्त ढोस उपाय योजना होत नाही, तसेच नागपूरच्या सीमेवरील भागात बिबटे आले आहेत. राज्यात 9-10 हजार बिबट्यांची संख्या आहे. जुन्नर तालुक्यात 55 लोकं गेल्या तीन महिन्यात बिबट्यांच्या हल्ल्यात दगावले आहेत. बिबट्यांना पकडायचं सोडून सरकार महिलांना, शेतकऱ्यांना, मुलाबाळांना काटरे लोखंडी पट्टा मानेला लावण्याचा सल्ला देत, घराभोवती तारेचं कुंपण करुन त्यात करंट सोडून आम्हाला आता बसण्याची वेळ आली असल्याचं विधान शरद सोनवणे यांनी केल आहे. दरम्यान त्यांनी हिवाळी अधिवेशनात या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याचे आवाहन केले. त्यांच्या मुद्दाची नागपूरमध्ये तुफान चर्चा सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number