मुरुड, २२ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड समुद्रकिनारी ४० लाख रुपये किमतीचे बेवारस चरस सापडले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या पोत्यात अंमली पदार्थाची पंधरा पाकिटे आढळली.
परदेशी जहाजांमधून चरसची पाकिटे समुद्रात पडली असावीत किंवा तस्करीच्या उद्देशानं मुद्दाम पाण्यात फेकली असावी, असा संशय सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. समुद्र किनाऱ्यावर सध्या शोधमोहीम सुरु आहे. स्थानिकांनी काही संशयास्पद वस्तू, बॅग आढळल्यास सीमाशुल्क विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.