मुंबई : कॉमेडियन भारती सिंह हिला एनसीबीने अटक केली आहे. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती गांजाचे सेवन करत असल्याची कबुली दिली असून दोघांवर ड्रग्ज सेवन केल्याचा आरोप आहे.
ड्रग्जच्या पेडलर्सकडून मिळालेल्या माहितीनुसार टीव्ही अभिनेत्री आणि कॉमेडियन भारती सिंहच्या घरी एनसीबीने अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोवा भागात धाड टाकली. धाडमध्ये भारती सिंह हिच्या घरात मादक पदार्थ सापडले आहे.
भारती सिंह हिने कॉमेडियन म्हणून चांगलीच प्रसिद्धी मिळवली शिवाय अनेक अवार्ड शोमध्ये आणि कार्यक्रमात तिच्या काॅमेडी करण्याच्या अंदाजाने भारतीने प्रेक्षकांचे मन जिंकली आहे तर सुशांत आत्महत्या प्रकरणात वेगवेगळे वळणं येत आहे.
एनसीबीच्या कारवाईत आतापर्यंत बॉलिवूडच्या अनेक मोठ्या कलाकारांची नाव समोर आली आहे. बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन आणि अंडरवर्ल्ड यांचा संबंध हा फार जुना आहे सध्या एनसीबी बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शनवर तपास करत आहे. आणखी किती नाव समोर येतील हे तपासामधून समोर येईल या प्रकरणी एनसीबी चौकशी सुरू आहे.