उन्हाळ्यात दररोज प्या लिंबूपाणी

जेवणात आंबट काही मिळाले तर जेवण अधिक रुचकर बनते. त्यात लिंबू हे व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, फोलेट आणि पोटॅशियम सारख्या पोषक तत्वांचे नैसर्गिक पॉवरहाऊस आहे. म्हणूनच उन्हाळ्यात रोज लिंबाचे सेवन केल्यास शरीरिला फायदा होतो.पाहूया लिंबूपाणी पिण्याचे फायदे- उन्हाळ्यात लिंबूपाणी पिण्याचे फायदे 1. वजन कमी करण्यास फायदेशीर लिंबूमध्ये पेक्टिन असते आणि त्याचा रस पिऊन आपल्याला बराच काळ […]

उन्हाळ्यात दररोज प्या लिंबूपाणी

जेवणात आंबट काही मिळाले तर जेवण अधिक रुचकर बनते. त्यात लिंबू हे व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, फोलेट आणि पोटॅशियम सारख्या पोषक तत्वांचे नैसर्गिक पॉवरहाऊस आहे. म्हणूनच उन्हाळ्यात रोज लिंबाचे सेवन केल्यास शरीरिला फायदा होतो.पाहूया लिंबूपाणी पिण्याचे फायदे-

उन्हाळ्यात लिंबूपाणी पिण्याचे फायदे

1. वजन कमी करण्यास फायदेशीर

लिंबूमध्ये पेक्टिन असते आणि त्याचा रस पिऊन आपल्याला बराच काळ पोट भरल्यासारखे वाटते, त्यामुळे आपले वजन आणि शरीरातील चरबी कमी होते.

2. ऊर्जेचा पुरवठा होतो

लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढून शरीरातील पांढऱ्या रक्तपेशींचे उत्पादन वाढविण्यास मदत होते.

3. पोटासाठी अतिउत्तम

लिंबाची साल आणि लगद्यामध्ये पेक्टिन नावाचा विद्रव्य फायबर असतो. हे यकृतामध्ये पाचक एंजाइम तयार करते जे शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते.

4. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते
उच्च फायबर असलेल्या फळांमध्ये रक्तातील साखर नियंत्रणात आणण्याची क्षमता असते. याशिवाय यामुळे मधुमेहाचा धोकाही कमी होतो.

5. बेस्ट अँटीऑक्सिडंट
फ्री रॅडिकल्सपासून आपले संरक्षण करण्यासाठी अँटीऑक्सिडंट्स हे एक महत्वाचे कंपाऊंड आहे. त्यामुळे लिंबाचा रस हृदयरोग, मधुमेह आणि अनेक प्रकारच्या कर्करोगासारख्या तीव्र परिस्थितीत अत्यंत उपयुक्त ठरते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number