लिफ्ट कोसळल्याने कोरोना रुग्णासह 3 जण जखमी

डोंबिवली: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात कोरोना रुग्णालयात कधी आग लागणे तर कधी ऑक्सिजनगळती सारख्या घटना घडत आहेत. आता डोंबिवलीमध्ये कल्याण शीळ रोड येथील एस. एस. टी. वैद्यरत्न या कोव्हीड रुग्णालयात लिफ्ट कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी ३ जण जखमी झाले आहेत. या जखमींमध्ये एका कोरोना रुग्णाचादेखील समावेश आहे. […]

लिफ्ट कोसळल्याने कोरोना रुग्णासह 3 जण जखमी

डोंबिवली: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात कोरोना रुग्णालयात कधी आग लागणे तर कधी ऑक्सिजनगळती सारख्या घटना घडत आहेत. आता डोंबिवलीमध्ये कल्याण शीळ रोड येथील एस. एस. टी. वैद्यरत्न या कोव्हीड रुग्णालयात लिफ्ट कोसळल्याची घटना घडली आहे.

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी ३ जण जखमी झाले आहेत. या जखमींमध्ये एका कोरोना रुग्णाचादेखील समावेश आहे.

‘लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता,त्यामुळे ही घटना घडली. याबाबत देखभाल दुरुस्ती विभागाला कळवलं आहे. या रुग्णांवरील उपचाराचा संपूर्ण खर्च आम्ही करणार आहोत’,असं रुग्णालय प्रशासनानं सांगितलं आहे.

संपादन- सिद्धी भरत पाटील

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number