‘हे ‘उपाय करा,निस्तेज चेहरा होईल तजेलदार

उन्हाळ्याच्या दिवसांत घराबाहेर पडणे सर्वानाच नकोसे वाटत असते. वाढती उष्णता आणि त्यामुळे उदभवणाऱ्या त्वचेच्या समस्या यामुळे आपण हैराण होतो. चेहऱ्यावर रेडनेस – रॅशेस , मुरूम – पुराळांची समस्या वाढते.यंत्रांमुळे या दिवसात चेहऱ्याला हायड्रेटेड ठेवणं महत्वाचं आहे. यासाठी आपण दुधाच्या मलईचा वापर करू शकता. दुधावर आलेली मलाई खायला तर आवडत असेलच तुम्हाला आता तीच मलई फक्त […]

‘हे ‘उपाय करा,निस्तेज चेहरा होईल तजेलदार

उन्हाळ्याच्या दिवसांत घराबाहेर पडणे सर्वानाच नकोसे वाटत असते. वाढती उष्णता आणि त्यामुळे उदभवणाऱ्या त्वचेच्या समस्या यामुळे आपण हैराण होतो. चेहऱ्यावर रेडनेस – रॅशेस , मुरूम – पुराळांची समस्या वाढते.यंत्रांमुळे या दिवसात चेहऱ्याला हायड्रेटेड ठेवणं महत्वाचं आहे. यासाठी आपण दुधाच्या मलईचा वापर करू शकता. दुधावर आलेली मलाई खायला तर आवडत असेलच तुम्हाला आता तीच मलई फक्त आरोग्यासाठी उपयुक्त नसून, चेहऱ्यावर लावल्याने आपल्या त्वचेची रंगत देखील वाढते.
मलई नैसर्गिकरित्या त्वचेला एक्सफोलिएट त्वचेचे पोषण करते. यामुळे टॅनिंगची समस्या दूर होते. दुधाची साय वापरण्यासाठी आपण त्यात इतर काही गोष्टी मिसळून फेसमास्क बनवू शकता. याने देखील त्वचा चमकदार आणि सुंदर दिसेल.

मलई आणि हळद
चेहरा चमकदार बनवण्यासाठी हळद मदत करते, त्यात मलई मिसळल्याने चेहरा अधिक तजेलदार होईल.यासाठी दोन चमचे मलईमध्ये चिमुटभर हळद मिसळून पेस्ट बनवा. त्यानंतर ही पेस्ट २० मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावून त्यानंतर सामान्य पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.

मलई आणि चंदन
चेहऱ्यावर चंदन पावडर लावल्याने चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येते आणि थंडावाही मिळतो. यासाठी चंदन पावडरमध्ये मिसळा आणि ही पेस्ट १५ मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावून ठेवा.

मलई आणि बेसन
मलईत बेसन मिसळून लावणे त्वेचेची फायदेशीर आहे. एक चमचा बेसनमध्ये एक चमचा मलई मिसळा. त्यानंतर हे मिश्रण १५ मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावून ठेवा. याने अतिरिक्त तेल शोषून घेतले जाते आणि त्वचा चमकदार होते.
मलई आणि मध
मधातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्मामुळे त्वचेची समस्या कमी होते. यासाठी एक चमचा मलईत एक चमचा मध मिसळा, आणि त्वचेला हलक्या हातांनी मसाज करून २० मिनिटांनंतर त्वचा स्वच्छ करा .

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number