Cyclone Ditwah: ‘दितवाह’ चक्रीवादळाची तामिळनाडूकडे धोकादायक कूच; अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट

दितवाह चक्रीवादळ तामिळनाडू - पुद्दुचेरी किनाऱ्याजवळ येत असून मुसळधार पाऊस, वेगवान वारे आणि पूरस्थितीचा इशारा देण्यात आला आहे.

Cyclone Ditwah: ‘दितवाह’ चक्रीवादळाची तामिळनाडूकडे धोकादायक कूच; अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट

तामिळनाडूच्या दिशेने वेगाने सरकत असलेले ‘दितवाह’ चक्रीवादळ (Ditwah Cyclone) आता किनाऱ्याच्या अधिक जवळ येत असून राज्यात सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रातील हवा आणि पाण्याचा वाढता दाब, त्यासोबत वेगवान वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता यामुळे तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ आणि तेलंगणा या राज्यांमध्ये सतर्कता वाढवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, चक्रीवादळ सध्या श्रीलंका किनारपट्टीजवळ फिरत आहे. पुढील काही तासांत हे वादळ बंगालच्या उपसागराच्या दक्षिण-पश्चिम भागात आणखी सरकेल आणि 30 नोव्हेंबरच्या पहाटेपर्यंत उत्तर तामिळनाडू–पुद्दुचेरी किनाऱ्याजवळ पोहोचेल. भारतीय हवामान विभाग प्रमुख डॉ. मृत्युंजय महापात्र यांनी सांगितले की, श्रीलंकेच्या बाहेर पडताच वादळात थोडी अधिक तीव्रता येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, दितवाह चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर थेट मोठा परिणाम अपेक्षित नसला तरी हवामानात बदल निश्चित दिसणार आहेत. राज्यात 2 ते 3 डिसेंबरपर्यंत थंडीचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह अनेक शहरांमध्ये गारठा जाणवत असून 28 नोव्हेंबर रोजी भंडारा येथे राज्यातील सर्वात कमी 10 अंश तापमानाची नोंद झाली. विदर्भातील काही भागांत हलक्या पावसाची शक्यता तर कोकणात ढगाळ वातावरण आणि तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नोव्हेंबरमध्ये थंडी आणि पावसाची मिश्र परिस्थिती निर्माण झाल्याने राज्यभर वातावरणातील बदल स्पष्ट जाणवू लागले आहेत.

हेही वाचा: India Flight Service: Airbus A320 विमानांमध्ये मोठा तांत्रिक बिघाड; देशात 250 विमानांचे उड्डाण धोक्यात

शनिवारी तामिळनाडूच्या किनारी जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कुड्डलोर, मायलाडुथुरै, विल्लुपुरम, चेंगलपट्टू आणि पुद्दुचेरी येथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सागरी भागांत 70 ते 90 किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणारे वारे झाडे उन्मळून टाकू शकतात आणि जुन्या किंवा कच्च्या घरांचे नुकसान होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. वादळामुळे निचांकी भागांत पाणी साचण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. मोठ्या शहरांमध्ये स्थानीक पूरस्थिती उद्भवू शकते, तर डोंगराळ भागांत आकस्मिक पूर म्हणजे फ्लॅश फ्लड्स निर्माण होण्याची शक्यता आहे.

या हवामानाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसू शकतो. भाजीपाला, फळे आणि फुलांच्या पिकांवर, विशेषतः पक्व अवस्थेतील उत्पादनावर मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचा अंदाज आहे. वादळाचा परिणाम शेजारील राज्यांमध्येही जाणवणार आहे. केरळमध्ये शनिवारी अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. आंध्र प्रदेश, याणम आणि रायालसीमा भागांमध्ये शनिवारी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. रविवारी काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा आहे.

तेलंगणामध्येही रविवारी काही भागांत जोरदार पाऊस होऊ शकतो. तामिळनाडू आणि पुद्दुचेरी येथील प्रशासनाने समुद्रकिनारी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन केले आहे. चक्रीवादळाचा मुख्य परिणाम रविवारपर्यंत राहू शकतो. त्यानंतर 1 डिसेंबरपासून पावसाची तीव्रता कमी होऊन हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

हेही वाचा: Train Tragedy : टीसीसोबत वाद विकोपाला; नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा ट्रेनमधून पडून मृत्यू

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number