एसटी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचा उद्रेक होईल, राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

  राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. शासनात विलगीकरण करण्याच्या मागणीत कर्मचाऱ्यांवर कोणत्याही कारवाई करण्यात येऊ नये, अशी मागणी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. तसेच संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई केली असता, कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचा उद्रेक होईल, असेही त्यांनी पत्राद्वारे सांगितले आहे.   […]

एसटी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचा उद्रेक होईल, राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

  राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. शासनात विलगीकरण करण्याच्या मागणीत कर्मचाऱ्यांवर कोणत्याही कारवाई करण्यात येऊ नये, अशी मागणी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. तसेच संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई केली असता, कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचा उद्रेक होईल, असेही त्यांनी पत्राद्वारे सांगितले आहे.

  कोरोना काळात आर्थिक समस्यांमुळे अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. तसेच एसटी महामंडळाला राज्य शासनात विलीन करण्याची मागणी अद्यापही राज्य सरकारकडून मान्य करण्यात आली नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अनेक आगारांमधील काम अद्यापही ठप्प आहे. ज्या आगारामद्ये सुरू आहे तिथेही असंतोष खदखदत आहे. यातच दिवाळीच्या दरम्यान कर्मचाऱ्यांना सेवा समाप्ती किंवा कारवाई करण्याच्या नोटीस बजावल्या जात आहेत. तसेच दबावतंत्राचा अवलंब करून कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घेण्यात येत आहे, असे राज ठाकरे यांनी पत्रात नमूद केले आहे.

  राज ठाकरे यांनी ट्विट केले की, ‘एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाछ्या मागणीसाटी उपोषण किंवा आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्ती वा अन्य कोणतीही कारवाई करण्यात येऊ नेय. अन्यथा, कर्मचारी-कामगारांमधील असंतोषाचा उद्रेक होईल.’

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number