‘या’ मराठी अभिनेत्रीच्या फेसबुक पोस्टवर अश्लील कमेंट, गुन्हा दाखल

प्रसिद्ध मराठी नृत्य अभिनेत्रीच्या फेसबुक पोस्टवर अश्लील कमेंट केल्याची घटना घडली आहे. अभिनेत्री मेघा घाडगेच्या फेसबुक पोस्टवर रविवारी एका व्यक्तीने अश्लील कमेंट केली. अश्लील कमेंट करणाऱ्या व्यक्तिविरोधात मेघा घाडे यांनी गुन्हा दाखल केला आहे. मीरा रोड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेघा घाडे यांनी काही दिवसापूर्वी फेसबुकवर नृत्य करतानाचा फोटो सामायिक केला होता. […]

‘या’ मराठी अभिनेत्रीच्या फेसबुक पोस्टवर अश्लील कमेंट, गुन्हा दाखल

प्रसिद्ध मराठी नृत्य अभिनेत्रीच्या फेसबुक पोस्टवर अश्लील कमेंट केल्याची घटना घडली आहे. अभिनेत्री मेघा घाडगेच्या फेसबुक पोस्टवर रविवारी एका व्यक्तीने अश्लील कमेंट केली.

अश्लील कमेंट करणाऱ्या व्यक्तिविरोधात मेघा घाडे यांनी गुन्हा दाखल केला आहे. मीरा रोड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेघा घाडे यांनी काही दिवसापूर्वी फेसबुकवर नृत्य करतानाचा फोटो सामायिक केला होता.

या फोटोवर अनेक कमेंट केल्या गेल्या. या कमेंट वाचत असताना अश्लील कमेंट निदर्शनास आली.

मेघा घाडे यांच्या फोटोवर अश्लील कमेटं करणाऱ्या विकृताचं नाव सरूप पांडा आहे.

या विकृताविरोधात तक्रार करण्यासाठी मेघा घाडे स्थानिक पोलीस ठाण्यात गेल्या. परंतु पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केला, असा आरोप मेघा घाडगे यांनी केला.

यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी भादंवि ३५४ (१) (४), ६७ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number