खोक्याच्या अटकेवर धसांची प्रतिक्रिया

अखेर सतिश भोसलेला प्रयागराजमधुन अटक करण्यात आलीय. बीड आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केलीय. सतिश भोसले उर्फ खोक्या हा सुरेश धसांचा जवळचा कार्यकर्ता आहे.

खोक्याच्या अटकेवर धसांची प्रतिक्रिया

अखेर सतिश भोसलेला प्रयागराजमधुन अटक करण्यात आलीय. बीड आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केलीय. सतिश भोसले उर्फ खोक्या हा सुरेश धसांचा जवळचा कार्यकर्ता आहे. त्यातच आता सतीश भोसलेचा पाय आणखी खोलात गेल्याची बातमी समोर आलीय. 8 मार्चच्या झाडाझडतीत वनविभागाकडून त्याच्याकडून गांजा जप्त करण्यात आलाय. सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरात गांजा सापडल्यानं खळबळ एकच खळबळ उडालीय. त्याचबरोबर खोक्याच्या घरातून प्राण्यांचे वाळलेलं मांसही हस्तगत करण्यात आलेय.या सर्व प्रकरणानंतर वनकर्मचाऱ्यांच्या फिर्यादीवरुन खोक्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामुळे खोक्याच्या अटकपूर्व जामीनात नवा अडथळा निर्माण झालाय. दरम्यान शिरूर कासार पोलीस ठाण्यात सतीश भोसले विरोधात तिसरा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

हेही वाचा: Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार की नाही

खोक्या भोसले वर कशी कारवाई? 
8 मार्च रोजी सतीश भोसलेच्या घरी वन विभाग व पोलिसांनी केलेल्या झाडाझडी सापडला गांजा.
काळ्या बाजारात 7 हजार 200 किंमत असलेला 600 ग्रॅम सुका गांजा वनविभागाने केला होता जप्त.
सतीश भोसलेच्या घरातून त्यादिवशी प्राण्याचे वाळलेलं मास सुद्धा करण्यात आले होते जप्त.
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सतीश उर्फ खोक्या भोसले विरोधात NDPS कायद्या अंतर्गत कलम 20 नुसार गुन्हा दाखल.

या सर्व प्रकरणावर आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिलीय. खोक्या भोसले याला अटक केलं हे चांगलं झालं. त्याने चूक केली, त्यामुळे त्याला अटक झाली. कायद्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई होईल, असे सुरेश धस म्हणाले आहेत. खोक्या भोसले याचे प्रकरण दाबल्यासाठी पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप होत आहे. त्यावर बोलताना धस म्हणाले की, मी असा कधीच पोलिसांना फोन केला नाही. त्याने जी चूक केली त्याच्यावर करवाई करा, असे म्हणालो आहे. सतीश भोसले याला आता अटक झाली आहे, त्याच्यावर जी काही कलमे लागलेली आहेत, त्याप्रमाणे कारवाई होईल, असे सुरेश धस म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number