Dharavi Fire Incident: रेल्वे लाईनजवळील धारावी झोपडपट्टी येथे भीषण आग; रेल्वेसेवेवर परिणाम

पश्चिम रेल्वेच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, पाच गाड्यांना तात्पुरते थांबवण्यात आले असून त्या माहिम आणि बांद्रा स्टेशन दरम्यान उभ्या आहेत.

Dharavi Fire Incident: रेल्वे लाईनजवळील धारावी झोपडपट्टी येथे भीषण आग; रेल्वेसेवेवर परिणाम

मुंबईसह राज्यातील अगीच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. मुंबईतील धारावी सायन माहीम लिंक रोड परिसरात रविवारी दुपारी माहीम फाटकाजवळील नवरंग कंपाउंडमध्ये मोठी आग लागली. आग इतकी तीव्र होती की परिसरातील नागरिकांनी लांबूनही ज्वाळा स्पष्टपणे पाहिल्या. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तत्काळ जागेवर पोहोचले.

दादर, बीकेसी, बांद्रा आणि शिवाजी पार्क फायर स्टेशनवरून अनेक अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट दिसत असल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. आग लागलेला भाग रेल्वे ट्रॅकच्या अगदी शेजारी असल्याने आग विझवण्याचे काम अधिक अवघड ठरले आहे. आग विझवण्याच्या प्रयत्नांमुळे रोडवरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून वाहनचालकांना दोन्ही बाजूंनी लांबच लांब वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. पटर्‍यांच्या अगदी जवळ ज्वाळा पसरल्याने पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवांवरही परिणाम झाला आहे.

हेही वाचा: Harman Sidhu Death: पंजाबी संगीतविश्वाला मोठा धक्का; गायक हरमन सिद्धू यांचे रस्ते अपघातात निधन

पश्चिम रेल्वेच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, पाच गाड्यांना तात्पुरते थांबवण्यात आले असून त्या माहिम आणि बांद्रा स्टेशन दरम्यान उभ्या आहेत. मात्र सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. अग्निशमन दलाचे कर्मचारी पाण्याच्या जोरदार फवाऱ्यांनी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू ठेवत आहेत. परिसरातील नागरिकांना सुरक्षित अंतरावर हलवण्यात आले असून पोलिसांनी गर्दी नियंत्रणासाठी अतिरिक्त पथके तैनात केली आहेत.

दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांत आगीच्या घटना वाढल्याचे चित्र दिसत आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई भागात सलग लागलेल्या आगींमुळे नागरिक आणि प्रशासन सतर्क झाले असून, इमारतींची सुरक्षा तपासणी, वायरिंगची देखभाल आणि औद्योगिक परिसरातील अग्निसुरक्षा नियमांचे पालन या बाबींवर विशेष भर दिला जात आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा मुंबईतील घनदाट वस्त्यांमध्ये अग्निसुरक्षेची गरज अधोरेखित झाली आहे.

हेही वाचा: Bank of India Recruitment: बँक ऑफ इंडियामध्ये 'या' पदांसाठी भरती; कशी असेल निवड प्रक्रिया?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number