Dhananjay Mundhe: ‘शारीरिकच नाही, राजकीय वजनही कमी झालं’; धनंजय मुंडेंचं मिश्किल वक्तव्य चर्चेत

परळी येथे आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी आपल्या फिटनेस, वजन घटवण्याच्या प्रवासाबरोबरच आगामी काळाविषयी आत्मविश्वास व्यक्त केला. तसेच लवकरच एक वेगळी सभा घेणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

Dhananjay Mundhe: ‘शारीरिकच नाही, राजकीय वजनही कमी झालं’; धनंजय मुंडेंचं मिश्किल वक्तव्य चर्चेत

राजकीय घडामोडींनंतर काही काळ सार्वजनिक चर्चेपासून दूर राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. परळी येथे आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी आपल्या फिटनेस, वजन घटवण्याच्या प्रवासाबरोबरच आगामी काळाविषयी आत्मविश्वास व्यक्त केला. तसेच लवकरच एक वेगळी सभा घेणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

परळी येथे एका न्यूट्रिशन फॅक्टरीच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, “मी नियमित जिम करतोय. स्वतःचं वजन बऱ्यापैकी कमी केलं आहे. काही काळ सर्वच क्षेत्रात आपलं वजन कमी झालं होतं, पण येणारा काळ आपलाच आहे. त्या काळासाठी तंदुरुस्त राहणं गरजेचं असल्याने मी जिम जॉईन केली.”

यावेळी त्यांनी आपल्या आगामी सभेचाही उल्लेख केला. “मी अशी एक सभा घेणार आहे, ज्यामध्ये कोणतेही भाषण करणार नाही. त्याऐवजी या वयातही आपण किती शारीरिकदृष्ट्या सक्षम आहोत, हे लोकांना प्रत्यक्ष दाखवणार. त्यासाठी शर्ट काढून फिटनेस दाखवेन आणि शेवटी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ म्हणेन,” असे त्यांनी सांगितले.

धनंजय मुंडे यांनी आपल्या प्रकृतीबाबत लोकांकडून वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचाही उल्लेख केला. “‘भाऊ, तब्येत कशी आहे?’ हा प्रश्न अनेकदा ऐकून मी त्रासलो होतो. त्यामुळे आता माझ्या प्रकृतीत झालेला बदल आणि फिटनेसचा परिणाम लोकांना प्रत्यक्ष दाखवायचा आहे,” असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून, त्यांच्या आगामी सभेकडे आणि पुढील राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number